Advertisement

सुक्या कचऱ्याच्या विल्हेवाटासाठी वर्षाला साडेपाच कोटींचा खर्च


सुक्या कचऱ्याच्या विल्हेवाटासाठी वर्षाला साडेपाच कोटींचा खर्च
SHARES

मुंबईत दरदिवशी निर्माण होणारा सुका कचरा उचलण्यासाठी महापालिकेच्यावतीनं खासगी कंत्राटदारांची निवड करण्यात येत आहे. एक वर्षांसाठी नेमण्यात येणाऱ्या या कंत्राटदारांना सुका कचरा वाहून नेण्यासाठी तब्बल साडेपाच कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. एका बाजुला सुका कचरा विकून कोट्यवधी रुपये कमवण्याचा मार्ग महापालिका प्रशासन हा सुका कचरा उचलण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे.


कचऱ्याच्या विल्हेवाटासाठी...

मुंबई शहरांमध्ये दररोज निर्माण होणाऱ्या घनकचऱ्यांमधून सुका कचरा वेगळा करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी २४ प्रभाग कार्यालयांमध्ये ३७ केंद्र निर्माण करण्यात आली आहे. निर्माण होणारा हा सुका कचरा संस्थांच्या माध्यमातून विल्हेवाट लावली जाते. त्यामुळे गोळा केलेला सुका कचरा केंद्रांमध्ये नेऊन विल्हेवाट लावण्यासाठी टाकण्यासाठी महापालिकेच्यावतीनं खासगी टेम्पो भाड्यानं घेण्यासाठी कंत्राटदारांची निवड केली आहे.


५ कोटी २७ लाखांचं कंत्राट

२४ प्रभागांमधील सुका कचरा वाहून नेण्यासाठी सात परिमंडळांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे सात कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. या सातही परिमंडळांसाठी एक वर्षाँसाठी ५ कोटी २७ लाखांचं कंत्राट देण्यात येत आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त विश्वास शंकरवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 


'असा' कोणताही विचार नाही

या खासगी टेम्पोतून वाहतूक करून जमा करण्यात आलेला सुका कचरा ३७ संकलन केंद्रांमध्ये जमा करण्यात येतो. कचरा वेचकांच्या संस्थांच्या माध्यमातून या सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. परंतु अशाप्रकारे सुका कचरा विकून पैसे कमवण्याचा प्रयत्न कोणत्याही महापालिकेच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे त्यासाठी ठेकेदार नेमून महापालिकेने पैसे कमवावे, असा कोणताही विचार नाही, असं त्यांनी सांगितले.


परिमंडळ निहाय नियुक्त कंत्राटदार

  • परिमंडळ १ :सुपरवेझ, ६९ लाख ६९ हजार रुपये
  • परिमंडळ २ : सुपरवेझ, ५४ लाख ६६ हजार रुपये
  • परिमंडळ ३ : लक्ष्य एंटरप्रायझेस, ७४ लाख ८ हजार रुपये
  • परिमंडळ ४ : पॉप्युलर ट्रान्सपोर्ट, ८९ लाख ०३ हजार रुपये
  • परिमंडळ ५ :एस.के. ग्रुप ऑफ कंपनीज, ७३ लाख ८७ हजार रुपये
  • परिमंडळ ६: स्वरुपा एंटरप्रायझेस, ९० लाख १९ हजार रुपये
  • परिमंडळ ७ : स्पॉट एंड साईट कलेक्शन सर्विसेस, ७६ लाख १४ हजार रुपये
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा