Advertisement

Russia-Ukraine Crisis: भारत सरकारकडून विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन नंबर जाहीर

युक्रेनमध्ये राहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारने हेल्पलाइन क्रमांक जाहीर केला आहे.

Russia-Ukraine Crisis: भारत सरकारकडून विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन नंबर जाहीर
SHARES

राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी लष्करी कारवाईचे आदेश दिल्यानंतर रशियानं युक्रेनवर क्षेपणास्त्रानं हल्ला केला आहे. या हल्ल्यात आतापर्यंत ५० जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १० नागरिकांचा बळी गेल्याचं समोर आलं आहे.

युक्रेनमधील वाढत्या तणावामुळे आता भारत सरकारनंही युक्रेनमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यूकेमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारनं हेल्पलाइन नंबरही जाहीर केला आहे.

खालील हेल्पलाईन नंबरशी संपर्क साधता येईल

१) + 38 0997300483

२) + 38 0997300428

३) + 38 0933980327

४) + 38 0635917881

५) + 38 0935046170

युक्रेन आणि रशियामधील युद्धासारख्या स्थितीमुळे राज्यातील १२०० विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. बुधवार, २३ फेब्रुवारी रोजी, महाराष्ट्राचे उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण मंत्री, उदय सामंत यांनी ट्विटरवरही माहिती दिली.

सामंत यांनी या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे महाराष्ट्रात परत आणण्यासाठी तातडीनं हस्तक्षेप करण्याची विनंती केली. ते पुढे म्हणाले की, इतर संसाधनांसह फ्लाइटची उपलब्धता नसल्यामुळे राज्यातील विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून आहेत.

शिवाय, राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या (CM) सचिवालयानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात महाराष्ट्रातील नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत आणि त्यामुळे सुरक्षेबाबत केंद्राशी समन्वय साधण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थिती पाहता युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी काय व्यवस्था करण्यात येत आहे आणि त्यांना सुखरूप परत आणण्यासाठी अधिकाऱ्यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी समन्वय साधला पाहिजे.

मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला विद्यार्थ्यांना विशेषत: युक्रेनमध्ये असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यास सांगितले.



हेही वाचा

रशिया-युक्रेन वादाच भारतावर काय होईल परिणाम?

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा