Advertisement

मैत्रिणीचे प्राण वाचवल्यानंतर सचिन तेंडुलकरनं मानले 'त्या' पोलिसाचे आभार

एका वाहतूक पोलीस हवालदारानं अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल करत तिचे प्राण वाचवल्याची माहिती समोर येत आहे.

मैत्रिणीचे प्राण वाचवल्यानंतर सचिन तेंडुलकरनं मानले 'त्या' पोलिसाचे आभार
SHARES

एका वाहतूक पोलीस हवालदारानं अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल करत तिचे प्राण वाचविल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईतील सांताक्रुझ परिसरात ही घटना घडली. 

वाहतूक पोलीस हवालदार सुरेश ढुमसे असं त्यांचं नावं असून त्यांनी निरुपमा चव्हाण (४७) या महिलेचा जीव वाचवला. विशेष म्हणजे संबंधीत महिला ही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरची परिचित होती. त्यामुळं सचिननं स्वत: ढुमसे यांची त्यांच्या तत्परतेबद्दल आभार मानले.

नेमकं प्रकरण काय?

निरुपमा चव्हाण (४७) या ३० नोव्हेंबरला रिक्षामधून सांताक्रुझ पोलीस ठाण्याजवळून जात होत्या. त्यावेळी एका अवजड वाहनाने रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबाला जोरदार धडक दिली. तो खांब चव्हाण प्रवास करत असलेल्या रिक्षावर कोसळला. त्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. तेथे कर्तव्यावर तैनात वाहतूक पोलीस सुरेश ढुमसे यांनी संवेदनशिलता दाखवून तात्काळ चव्हाण यांना रिक्षामध्ये बसवून नानावटी रुग्णालयात नेले. सचिनला कळाल्यानंतर त्याने प्रत्यक्ष ढुमसे यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

सचिन तेंडूकरनं याबाबत ट्वीट करून वाहतूक पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेचे कौतुक केले. सचिनचं हे ट्वीट मुंबई पोलीस या ट्विटरवर अकाऊंटवरून रिट्वीट करण्यात आले आहे. मास्टर ब्लास्टर मैदानावरील बेस्टमनला भेटला, असं या ट्वीटच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे.

सुरेश ढुमसे यांच्यामुळेच सचिनच्या मैत्रिणीला सांताक्रूझ पीएसटीएन जंक्शन इथं रस्ता अपघातानंतर नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात मदत झाली. सचिनने ढुमसे यांचे कौतुक करत ट्विटरवर एक भावनिक संदेश लिहिला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा