पायवाट वाचवण्यासाठी गावकरी आता रस्त्यावर

 Andheri
पायवाट वाचवण्यासाठी गावकरी आता रस्त्यावर

मुंबई - सहार गाव, सुतार पाखाडी, गावठाण येथील 100 वर्षांहुन अधिक जुनी पायवाट वाचवण्यासाठी आता गावकरी रस्त्यावर उतरणार आहेत. शनिवारी 4 मार्चला सहार कार्गो कॉम्प्लेक्स येथे अंदाजे 3000 गावकरी कॅन्डल मार्च काढत पायवाट गायब करण्याच्या जीव्हीके, एमएमआरडी आणि एमआईएएलच्या निर्णयाचा निषेध करणार आहेत. संध्याकाळी 7 वाजता हा कॅन्डल मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती येथील रहिवाश्यानी दिली आहे.

विमानतळ सुशोभीकरण प्रकल्पातील रस्त्यासाठी पायवाटेची जागा बेकायदेशीररित्या घेण्यात येत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. ही पायवाट ताब्यात घेण्यासाठी आलेल्या जीव्हीकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना काही दिवसापूर्वी हुसकावून लावले होते. तर, कोणत्याही परिस्थितीत पायवाटेची एक इंच जागा ही देणार नसल्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे. आता ही पायवाट वाचवण्यासाठी जनआंदोलन छेडले आहे.

Loading Comments