मैदानासाठी विद्यार्थ्यांचा मूक मोर्चा

 Pratiksha Nagar
मैदानासाठी विद्यार्थ्यांचा मूक मोर्चा
मैदानासाठी विद्यार्थ्यांचा मूक मोर्चा
मैदानासाठी विद्यार्थ्यांचा मूक मोर्चा
मैदानासाठी विद्यार्थ्यांचा मूक मोर्चा
See all

सायन - कै. अनंत नारायण दळवी मैदान वाचविण्यासाठी शाळकरी मुलांनी पालिकेच्या एफ उत्तर कार्यालयावर शनिवारी मूक मोर्चा काढला.

या मूक मोर्चाचे आयोजन 'कै. अनंत नारायण दळवी क्रीडांगण बचाओ समिती'च्यावतीने करण्यात आले होते. यात सायन परिसरातील आठ शाळांतील शेकडो विध्यार्थांसह अनेक क्रीडाप्रेमींनी भाग घेतला होता. मोर्चाला हिंसक वळण लागू नये म्हणून मैदान परिसरात सायन पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या मूक मोर्चात सायन धारावी स्पोर्ट असोसिएशन अध्यक्ष आनंद निंदी, सचिव बाबाजी घुले, अशोक कुर्मी, भरत अडलजा आदी सहभागी झाले होते. यावेळी पालिका अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. पालिका अधिकाऱ्यांनी निवेदन वरिष्ठांपर्यंत पोचविण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने समितीने मोर्चा मागे घेतला. मात्र योग्य निर्णय न घेतल्यास पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा समितीच्यावतीने देण्यात आला आहे.

Loading Comments