Advertisement

महात्मा फुले जयंती निमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप


महात्मा फुले जयंती निमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप
SHARES

समाजातील विषमता नष्ट करणे आणि तळागाळापर्यंतच्या लोकांपर्यंत शिक्षण पोहचवण्याचे कार्य करणारे क्रांतिकारक महात्मा जोतिबा फुले यांची जयंती मंगळवारी युवा आधार फाऊंडेशन आणि सकल ओबीसी समाज यांच्या वतीने मंगळवारी साजरी करण्यात आली. यानिमित्ताने 200 हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.

माटुंगा लेबर कॅम्प येथे झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सकल ओबीसी समाजच्या महाराष्ट्र अध्यक्ष कांचन नाईक यांनी केले.  या कार्यक्रमात उपस्थित शालेय विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले.

या वेळी महात्मा फुलेंच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षपद युवा आधार फाऊंडेशनचे अध्यक्ष गोरख उबाळे यांनी भूषवले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जय भीम फाऊंडेशनचे मार्गदर्शक रमेश जैस्वार, बौद्धजन विकास योजनेचे सुशील जाधव, सिद्धार्थ तपासे यांच्यासह युवा आधार फाऊंडेशनचे सदस्य आणि सकल ओबीसी समाजचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा