Advertisement

विद्यार्थ्यांमध्ये वाढतोय लठ्ठपणा, ९ हजार शालेय विद्यार्थ्यांची तपासणी

४ हजार ८०६ मुलांमधील १ हजार २८ मुलांचे वजन जास्त असून, ८१७ मुलांमध्ये लठ्ठपणा आढळला. ४ हजार १९४ मुलींमधील ८०५ मुलींचे वजन जास्त आहे.

विद्यार्थ्यांमध्ये वाढतोय लठ्ठपणा, ९ हजार शालेय विद्यार्थ्यांची तपासणी
SHARES

मुंबईतील मुलांमध्ये स्थूलपणाचं प्रमाण वाढत असल्याचं दिसून आलं आहे. २१ टक्के शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्थूलत्वाची समस्या दिसून आली आहे. मुंबईत शहर आणि उपनगरातील १५ शाळांमधील ११ ते १५ या वयोगटांतील सुमारे ९ हजार शालेय विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.  विद्यार्थ्यांची शरीर संरचना, बॉडी मास इंडेक्स (बीएमआय), आजार आणि आहार यावर आधारित ही तपासणी केली गेली. 

या तपासणीत २१ टक्के मुलांमध्ये स्थूलत्व दिसून आले. तर  ४ हजार ८०६ मुलांमधील १ हजार २८ मुलांचे वजन जास्त असून, ८१७ मुलांमध्ये लठ्ठपणा आढळला.  ४ हजार १९४ मुलींमधील ८०५ मुलींचे वजन जास्त आहे. यामधील ६१२ मुली लठ्ठपणाने त्रस्त आहेत. ५,३३७ मुले दोन तासांपेक्षा जास्त लॅपटॉप, टीव्ही, मोबाइलचा वापर करत असल्याचं समोर आलं आहे.  तर दोन तासांपेक्षा कमी मोबाइलचा वापर करणाऱ्या मुलांची संख्या ३,६६३ इतकी आहे. या मुलांमध्ये आळस, श्वास घेण्यास अडचणी, अंगावरील चट्टे अशा प्रकारची लठ्ठपणाची लक्षणे दिसून आली. 

बदलती जीवनशैली, जंक फूड,  व्यायामाचा अभाव  यामुळे वजन वाढून मुलांमध्ये लठ्ठपणा वाढत आहे. वाढत्या वजनामुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब, हाइपरलिपीडेमिया, इन्सुलिनप्रतिरोध यासारख्या आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे पालकांनी आणि शिक्षकांनी याकडं वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे. 



हेही वाचा -

हलाखीत राहणाऱ्या माजी नगरसेवकांचं पालकत्व पालिकेनं घ्यावं, नगरसेवकांची मागणी

सायन रुग्णालयातल्या रुग्णांच्या आहारात चपाती




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा