Advertisement

हलाखीत राहणाऱ्या माजी नगरसेवकांचं पालकत्व पालिकेनं घ्यावं, नगरसेवकांची मागणी

कुटुंबियांनी दुर्लक्ष केल्यामुळे वृद्धापकाळात एकाकी जीवन जगत असलेल्या आणि आरोग्यावरील खर्च परवडत नसलेल्या माजी नगरसेवकांबाबत आता चिंता व्यक्त केली जात आहे.

हलाखीत राहणाऱ्या माजी नगरसेवकांचं पालकत्व पालिकेनं घ्यावं, नगरसेवकांची मागणी
SHARES

कुटुंबियांनी दुर्लक्ष केल्यामुळे वृद्धापकाळात एकाकी जीवन जगत असलेल्या आणि आरोग्यावरील खर्च परवडत नसलेल्या माजी नगरसेवकांबाबत आता चिंता व्यक्त केली जात आहे. अशा माजी नगरसेवकांचे  मुंबई महापालिकेने पालकत्व स्वीकारावे आणि त्यांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे. 

शिवसेनेच्या माहीममधील माजी नगरसेविका इंदूमती माणगावकर यांचा वृद्धाश्रमात मृत्यू झाला. माणगावकर यांच्याप्रमाणे अनेक माजी नगरसेवकांना आर्थिक परिस्थितीमुळे हलाखीचे जीवन जगावे लागत आहे.  या माजी वृद्ध नगरसेवकांचा आणि त्यांच्या औषधपाण्याचा खर्च त्यांच्या कुटुंबाला पेलवत नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे अनेक माजी नगरसेवकांना वैद्यकीय उपचार मिळत नाहीत. तर काहींना एकाकी जीवन जगावे लागत आहे. अशा हलाखीच्या परिस्थितीत राहणाऱ्या माजी नगरसेवकांच्या आरोग्याची जबाबदारी पालिकेने घ्यावी, अशी मागणी काँग्रेस नगरसेविका सोनम जामसूतकर यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.

माजी नगरसेवकांना कुटुंबातील व्यक्ती किंवा अन्य नातेवाईक त्यांना रुग्णालयात सोडून जातात. त्यांची सुश्रुषा करत नाही किंबहुना त्यांना एकाकी सोडून देतात. ज्यांनी आपले जीवन लोकसेवेसाठी समर्पित केले, अशा माजी नगरसेवकांना जीवनाच्या शेवटच्या काळात अनेक त्रासांना सामोरे जात असतात, असे जामसूतकर यांनी या सूचनेत म्हटले आहे. त्यामुळे ज्या माजी नगरसेवकांना वार्धक्याच्या काळात हाल सोसावे लागतात, त्यांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांचे पालकत्व मुंबई पालिकेने घ्यावे व यासाठी महापौरांच्या अधिकारातील निधीतून पैसा खर्च केला जावा, अशी सूचना त्यांनी केली आहे.हेही वाचा -
 
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा