Advertisement

महापालिकेचे दवाखाने राहणार रात्री ११ वाजेपर्यंत खुले

रुग्णांना ४ वाजल्यानंतर उपचार घेता यावे यासाठी महापालिकेनं दवाखान्यांमध्ये कंत्राटदाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेचे दवाखाने राहणार रात्री ११ वाजेपर्यंत खुले
SHARES

मुंबईतील गरीब कुटुंबातील रुग्णांना चांगले उपचार मिळावे यासाठी महापालिकेनं मुंबईतील अनेक भागात दवाखाने सुरू केले आहेत. या रुग्णांमध्ये गरीब रुग्णांची मोठ्या प्रमाणात उपचारासाठी गर्दी जमते. अनेकदा या रुग्णांना दुपरच्या वेळेत म्हणजे ४ वाजेच्यानंतर उपचार घेता येत नाही. त्यामुळं या रुग्णांना ४ वाजल्यानंतर उपचार घेता यावे यासाठी महापालिकेनं दवाखान्यांमध्ये कंत्राटदाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. कंत्राटदाराच्या माध्यमातून १५ दवाखान्यांमध्ये २ वर्षे दुपारी ४ ते रात्री ११ या वेळेत रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत.

रुग्णांवर उपचार

कंत्राटदाराकडून उपलब्ध करण्यात येणारे वैद्यकीय अधिकारी आणि बहुउद्देशीय कामगारांच्या वेतनापोटी महापालिकेला २.७९ कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यानं मुंबईत विविध ठिकाणी उपलब्ध केलेल्या १८६ दवाखान्यांमध्ये सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत रुग्णांवर उपचार केले जातात. कार्यालयात जाणाऱ्या अनेकांना सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत दवाखान्यात जाऊन उपचार घेता येत नाहीत.

महापौरांकडे मागणी

खासगी दवाखान्यात उपचार घेणं त्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. ही बाब लक्षात घेत महापालिकेचे दवाखाने दुपारी ४ ते रात्री ११ या वेळेत खुले ठेवावे, अशी मागणी करणारे पत्र आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले यांनी महापौरांना पाठविलेल्या पत्रात केली होती. या पत्राची दखल घेत महापौरांनी दवाखाने दुपारी ४ ते रात्री ११ या वेळेत खुले ठेवण्याची सूचना केली. मात्र, मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळं प्रशासनानं निवडक १५ दवाखानं कंत्राटदारामार्फत दुपारी ४ ते रात्री ११ या वेळेत खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

कामगारांचा पुरवठा

दवाखान्यांसाठी वैद्यकीय अधिकारी (डॉक्टर) आणि बहुउद्देशीय कामगारांचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांसाठी प्रशासनानं निविदा प्रक्रिया राबविली होती. मात्र, कंत्राटदारांकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळं निविदा प्रक्रियेला ४ वेळा मुदतवाढ देण्याची वेळ प्रशासनावर आली. चौथ्या वेळी २ कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला. प्रशासनाने वैद्यकीय अधिकारी आणि बहुउद्देशीय कामगाराच्या मानधनासाठी प्रति महिना अनुक्रमे ५९ हजार ६७५ रुपये आणि १७ हजार ७९२ रुपये इतक्या खर्चाचा अंदाज निविदेमध्ये व्यक्त केला होता.

वैद्यकीय अधिकारी आणि बहुउद्देशीय कामगारास प्रतिमहिना अनुक्रमे ६० हजार रुपये आणि १५,५०० रुपये मानधन देण्याची तयारी दाखविणाऱ्या रुबी अलकेअर सव्‍‌र्हीसेस कंपनीला हे काम देण्याचा निर्णय घेतला आहे. कंत्राट दाराला प्रत्येक दवाखान्यात एक वैद्यकीय अधिकारी आणि बहुउद्देशीय कामगार उपलब्ध करावा लागणार आहे.हेही वाचा -

सुरळीत वाहतुकीसाठी पोलिसांची आणखी २१४४ पदे

मुंबईतील १० टक्के पाणीकपात आठवडाभर पुढेसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा