Advertisement

सुरळीत वाहतुकीसाठी पोलिसांची आणखी २१४४ पदे

राज्यातील वाहतुककोंडीसह होणाऱ्या अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी राज्य पोलीस दलात आता आणखी २१४४ पदे भरण्यात येणार आहेत.

सुरळीत वाहतुकीसाठी पोलिसांची आणखी २१४४ पदे
SHARES

मुंबईसह राज्यभरातील वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. या वाढलेल्या संख्येमुळं रस्ते- महामार्गावर वाहनांच्या लांब-लांब रांगा लागत असून, अनेक अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळं या वाहतुककोंडीसह होणाऱ्या अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी राज्य पोलीस दलात आता आणखी २१४४ पदे भरण्यात येणार आहेत.

सुरळीत वाहतूक

३ उपायुक्त, ६ उपअधीक्षकांसह २७ पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश असणार आहे. त्यामध्ये मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत सर्वाधिक ६२० पदे देण्यात आली आहेत. याबाबत गृह विभागानं घटकनिहाय पदांच्या वाटपाला हिरवा कंदील दाखविला आहे. उच्च न्यायालयानं सुचविलेल्या उपाययोजनांनुसार सुरळीत वाहतूक नियंत्रणासाठी पहिल्या टप्प्यात इतकी पदे भरण्यात येत आहेत. त्यानंतर आणखी जागांची निर्मिती केली जाणार आहे.

जनहित याचिका

वाहतूककोंडीच्या समस्येवर कारवाईसाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका २०१३ मध्ये दाखल करण्यात आली होती. ती निकालात काढताना न्यायालयानं राज्य सरकारला विविध उपाययोजना सुचिवल्या. त्यानुसार, वाहतूक शाखेसाठी स्वतंत्र पदांची निर्मिती करण्याची सूचना होती. त्यांच्याकडं रस्त्यावरील वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा ठरणारी, अनधिकृतपणे रस्त्यावर सोडून देण्यात आलेली तसंच, या वाहनांसोबतच बेवारस वाहनं हटविणे ही जबाबदारी प्रामुख्यानं सोपविण्यात येणार आहे.

विविध उपाययोजना

वाहतुकीच्या वाढणाऱ्या समस्या लक्षात घेता या समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी संंबंधित अधिकारी, अंमलदारांनी विविध उपाययोजना राबवायच्या आहेत. न्यायालयानं सुचविलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार पोलीस महासंचालकांनी राज्यभरातील विविध वाहतूक शाखांकरिता विविध दर्जाची एकूण २१४४ पदे नव्यानं निर्माण करण्याचा प्रस्ताव या वर्षी २३ जानेवारीला गृह विभागाला सादर करण्यात आला होता.

संवर्गनिहाय पदे

पद संख्या
अधीक्षक 
उपअधीक्षक 
निरीक्षक २७
साहाय्यक निरीक्षक ६३
उपनिरीक्षक १०८
साहाय्यक फौजदार १२६
हवालदार ३७९
शिपाई ११४३



हेही वाचा -

पावसाचं पाणी साठवण्यासाठी भूमिगत टाक्यांचा वापर

मुंबईचे डब्बेवाले देणार 10 रुपयात थाळी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा