Advertisement

पावसाचं पाणी साठवण्यासाठी भूमिगत टाक्यांचा वापर

मिठी नदीची पूरस्थिती कमी करण्यासाठी उपाययोजना आखणाऱ्या मुंबई महापालिकेनं जपानच्या धर्तीवर जलबोगद्याचा प्रयोग राबवण्याचा निर्धार केला आहे.

पावसाचं पाणी साठवण्यासाठी भूमिगत टाक्यांचा वापर
SHARES

मुंबईत पावसाळ्यात दरवर्षी जास्तीचा पाऊस झाला की मिठी नदीला पूरस्थिती निर्माण होते. पूरस्थितीमुळं नदीच्या आसपासच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळं त्यांचं स्थलांतर करण्यात येतं. त्यामुळं या मिठी नदीची पूरस्थिती कमी करण्यासाठी उपाययोजना आखणाऱ्या मुंबई महापालिकेनं जपानच्या धर्तीवर जलबोगद्याचा प्रयोग राबवण्याचा निर्धार केला आहे.

गैरसोयीचा सामना 

पावसाळ्यात साचणारं पाणी भूमिगत टाक्यांमध्ये साठवण्याचाही पर्याय स्वीकारण्याचा विचार आहे. मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असताना समुद्राला भरती असल्यास अनेक भागांत पाणी तुंबत असल्यानं मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी पालिकेकडून उपाययोजना सुरू करण्यात येत आहेत. यामध्ये टोकियोमध्ये राबवण्यात येणारा भूमिगत जलबोगद्याचा प्रयोग मुंबईतही राबवण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू आहेत.

भूमिगत टाक्या

पावसामुळं जमिनीवर तुंबणारं पाणी भूमिगत टाक्या बांधून त्यामध्ये साठवलं जाणार आहे. या कामाचा अनुभव असलेल्या जपानी कंपनीच्या अधिकारी व तज्ज्ञांनी काही दिवसांपूर्वीच प्रस्तावित प्रकल्पाचं सादरीकरण महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना केलं आहे.



हेही वाचा -

'नीट'साठी अर्जप्रकिया सुरू, ३ मे रोजी परीक्षा

फडणवीसांच्या काळातील ६ महिन्यांच्या फाईल मागवल्या



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा