'नीट'साठी अर्जप्रकिया सुरू, ३ मे रोजी परीक्षा

राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेसाठी (नीट) अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे.

SHARE

राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेसाठी (नीट) अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे. एमबीबीएएस, बीडीएस अभ्यासक्रमांसाठी ३ मे रोजी 'नीट' परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेचं नियोजन करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं वेळात्रक जाहीर केलं आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे.

वेळापत्रक जाहीर

राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेसाठी (नीट) ही परीक्षा ३ मे २०२० रोजी घेण्यात येणार आहे. तसंच, ४ जूनला या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया, नोंदणी शुल्क, दुरुस्ती, पात्रता याबाबतच्या माहितीसह संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. २ डिसेंबरपासून माहिती पुस्तका, अर्ज भरण्याची सुरू झालेली प्रक्रिया ३१ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

हॉल तिकीट उपलब्ध

अर्ज भरताना आवश्यक ती कागदपत्रे, पात्रता याची माहिती वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जातील दुरुस्ती प्रक्रिया विद्यार्थ्यांना जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात करता येणार आहे. २७ मार्चला हॉल तिकीट उपलब्ध होणार आहेत. खुला प्रवर्ग, ओबीसी प्रवर्गासाठी एक हजार ४०० रुपये तर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ७५० रुपये शुल्क असणार आहे. देशभरात १५५ शहरांत ही परीक्षा घेतली जाणार आहे.हेही वाचा -

फडणवीसांच्या काळातील ६ महिन्यांच्या फाईल मागवल्या

मुंडेसाहेब यांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल, उद्धव यांचा पंकजांना रिप्लायसंबंधित विषय
ताज्या बातम्या