Advertisement

सायन रुग्णालयातल्या रुग्णांच्या आहारात चपाती

महापालिकेच्या सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील रुग्णांना आता आहारात चपाती उपलब्ध होणार आहे.

सायन रुग्णालयातल्या रुग्णांच्या आहारात चपाती
SHARES

महापालिकेच्या सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील रुग्णांना आता आहारात चपाती उपलब्ध होणार आहे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना सकस आहारात चपाती उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाला कंत्राटदार सापडला असून, आवश्यक ते सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर या कंत्राटदारामार्फत रुग्णालयातील रुग्णांना दुपार आणि रात्रीच्या जेवणात प्रत्येकी ४ चपात्या देण्यात येणार आहे.

मोफत आहार

सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना दुपार आणि रात्री मोफत आहार देण्यात येतो. रुग्णांना सकस आहार मिळावा यासाठी दोन्ही वेळच्या जेवणात प्रत्येकी ४ चपात्या देण्यात येत होत्या. चपातीचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराची मुदत १२ एप्रिल २०१९ रोजी संपुष्टात आल्यानं प्रशासनानं ३ वर्षे रुग्णालयाला चपातीचा पुरवठा करण्यासाठी ई-निविदा मागविल्या. मात्र, काही तांत्रिक कारणास्तव ही ई-निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली.

अंदाजपत्रक तयार

रुग्णालयातील १५०० आंतररुग्णांना दररोज दुपारी व संध्याकाळी प्रत्येकी ४ चपाती पुरविण्यासाठी १ कोटी ६५ लाख ७१ हजार ५२० रुपयांचं अंदाजपत्रक प्रशासनानं तयार केलं होतं. प्रति चपाती २ रुपये ५२ पैसे असा दर त्यात निश्चित करण्यात आला होता. प्रशासनानं पुन्हा मागविलेल्या ई-निविदेस कंत्राटदारांकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळं त्यास मुदतवाढ द्यावी लागली होती.


निविदा प्रक्रियेस प्रतिसाद

मुदतवाढीनंतर २ कंत्राटदारांनी निविदा प्रक्रियेस प्रतिसाद दिला. मात्र, पालिकेच्या प्रचलित धोरणानुसार २ कंत्राटदारांनी प्रतिसाद मिळाल्यामुळं पुन्हा निविदा प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली. परंतु अन्य कंत्राटदारांकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळं २ कंत्राटदारांपैकी २ रुपये ६५ पैसे दराने चपातीचा पुरवठा करण्यास तयार असलेल्या कुमार फूड्स मॅनेजमेंट सव्‍‌र्हिसेसला १ कोटी ७४ लाख २६ हजार ४०० रुपयांचं कंत्राट देण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे.हेही वाचा -

हलाखीत राहणाऱ्या माजी नगरसेवकांचं पालकत्व पालिकेनं घ्यावं, नगरसेवकांची मागणी

माहिममध्ये एका सुटकेसमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा