Advertisement

शाळांमध्ये ८ ते १४ नोव्हेंबर बाल सप्ताह साजरा होणार

महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागानं राज्यभरातील शाळांना ८ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत बाल सप्ताह साजरा करण्यास सांगितलं आहे.

शाळांमध्ये ८ ते १४ नोव्हेंबर बाल सप्ताह साजरा होणार
SHARES

महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागानं राज्यभरातील शाळांना ८ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत बाल सप्ताह साजरा करण्यास सांगितलं आहे. भारतात जवाहरलाल नेहरू यांना श्रद्धांजली म्हणून बालदिन साजरा केला जातो. त्याच निमित्तानं बाल सप्ताह साजरा करण्यात येईल.

याअंतर्गत महाराष्ट्रातील शाळांना उपक्रम राबवावे लागतील. ऑनलाईन पद्धतीनं हे उपक्रम राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आठवड्याभरात, विद्यार्थ्यांमार्फत निबंध लेखन, वक्तृत्व, व्हिडिओ मेकिंग अशा अनेक स्पर्धा शाळांमार्फत आयोजित केल्या जातील.

शिवाय, अहवालानुसार शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांची छायाचित्रे #baldivas 2020 हे हॅशटॅग पृवापरून सोशल मीडियावर अपलोड करू शकतात. राज्य शिक्षण विभागानं गुरुवारी जाहीर केलेल्या परिपत्रकात हे नमूद करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त स्पर्धेचा भाग म्हणून विद्यार्थी प्रवेशाचा न्याय करण्यासाठी तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय समिती स्थापन केली जाईल.

नेहरूंना प्रेमानं ‘चाचा नेहरू’ म्हणून ओळखले जाते. नेहरूंचा जन्म १ नोव्हेंबर, १८८९ रोजी झाला. त्यांनी मुलांसाठी सिनेमा तयार करण्यासाठी १९५५ मध्ये चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी इंडियाची स्थापना केली होती. त्यांचं मुलांवर किती प्रेम होते हे सर्वांनाच माहित आहे.

१९६४ पूर्वी, भारतानं २० नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला होता.  १९६४ मध्ये पंडित नेहरूंच्या निधनानंतर त्यांचा स्मृतिदिन म्हणून त्यांचा वाढदिवस बालदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.



हेही वाचा

ठाण्यातील दोन गावांनी विद्यार्थ्यांसाठी केली मोफत वायफायची सोय

दिवाळीनंतर शाळा सुरू? शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा