निवडणूक आयोगाने 30 प्रभागांची सीमारेषा बदलली

 Pali Hill
निवडणूक आयोगाने 30 प्रभागांची सीमारेषा बदलली
निवडणूक आयोगाने 30 प्रभागांची सीमारेषा बदलली
See all

मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग पुनर्रचनेसंदर्भात 629 आक्षेप (सूचना-हरकती) निवडणूक आयोगाला प्राप्त झाल्या होत्या. याचा अभ्यास करत केवळ 28 आक्षेपांची दखल घेतली आहे. त्यानुसार मुंबईतील केवळ 30 प्रभागांची सीमारेषा बदलल्याची माहिती आयोगाने माहिती अधिकाराखाली आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिली आहे.

629 आक्षेपांच्या सुनावणीस केवळ 266 आक्षेपधारकांनी उपस्थिती लावली होती. त्यानुसार तब्बल 601 आक्षेप नामंजूर करत केवळ 28 आक्षेप मंजूर केलेत.

सुनावणीनंतर बदलण्यात आलेले प्रभाग क्रमांक

20, 21, 22, 25, 26, 27, 75, 86, 95, 96, 104, 107, 108, 124, 126, 127, 128, 132, 143, 145, 156, 157, 163, 164, 187, 189, 191, 192, 195

28 आक्षेपांमध्ये सर्वाधिक आक्षेप हे राजकीय नेत्यांकडून आल्याचेही समोर आले आहे. यात विरोधी पक्षनेते प्रविण छेडा, सुधार समितीचे अध्यक्ष प्रकाश गंगाधरे, प्रमोद सावंत, हारून खान, शैलजा गिरकर, विष्णू गायकवाड, प्रभाग समितीचे अध्यक्ष सुधीर जाधव, किशोरी पेडणेकर, श्रीकांत कवठणकर अशी नावे समाविष्ट आहेत.

Loading Comments