Advertisement

'चला वाचू या' उपक्रमाला वाचकांची पसंती


'चला वाचू या' उपक्रमाला वाचकांची पसंती
SHARES

उत्तम साहित्य वाचनाची आवड निर्माण व्हावी, लोकांनी अभिरुचीपूर्ण वाचनाकडे वळावे या उद्देशाने 'व्हिजन संस्थेने' 'चला वाचू या' हा एक वेगळा उपक्रम सुरू केला आहे. रविवारी 18 जून रोजी 'चला वाचू या' या उपक्रमाचा दुसरा वर्धापनदिन मुंबईत पार पडला. त्या निमित्त आयोजित सत्रात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, दिग्दर्शक विजय केंकरे, लेखक दिग्दर्शक विवेक देशपांडे अभिवाचक म्हणून सहभागी झाले होते.

हा उपक्रम 2015 सालापासून सुरू करण्यात आला असून, रसिकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य असल्याने या कार्यक्रमाला श्रोत्यांचा भरभरुन प्रतिसाद लाभला आहे. रविवारी प्रभादेवीच्या पु. ल. देशपांडे कला अकादमी येथे आयोजित करण्यात आलेल्या 'चला वाचू या' कार्यक्रमात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने मुकुंद टाकसाळे यांच्या निवडक कथांचे वाचन केले.

तर, विजय केंकरे यांनी अनंत काणेकर यांच्या 'धुक्यातून लाल ताऱ्याकडे' या मधील निवडक कथांचे वाचन केले. तसेच मराठामध्ये काम करत असताना विजय तेंडुलकर यांच्यासोबत आलेल्या अनुभवातून तेंडुलकर यांनी अत्रेंविषयी लिहिलेल्या लेखाचे वाचन केले. यावेळी विवेक देशपांडे यांनी देखील काही निवडक लेखांचे वाचन केले. पुढील कार्यक्रम 13 ऑगस्टला होणार असल्याचे व्हिजनचे संचालक श्रीनिवास नार्वेकर यांनी यावेळी सांगितले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा