Advertisement

विमानतळावरील टोल विरोधात शिवसेनेचे आंदोलन


विमानतळावरील टोल विरोधात शिवसेनेचे आंदोलन
SHARES

मुंबई विमानतळाबाहेर प्रवाशांकडे वाहन पार्किंगसाठी आकारल्या जाणाऱ्या टोल विरोधात विमानतळावर शिवसेनेने मंगळवारी तीव्र आंदोलन केले. पुन्हा टोलवसुली सुरू झाल्यास विमानतळ बंद पाडू असा धमकी वजा इशारा व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या जीव्हीके कंपनीला शिवसेनेने दिला आहे.

मागील काही महिन्यांपासून मुंबई विमानतळाबाहेर प्रवाशांकडून टोल वसूल केला जात आहे. तो आता 130 रुपयांच्या घरात गेला आहे. त्यातून जीव्हीके कंपनीला महिन्याला सुमारे 35 ते 40 लाख रुपये उत्पन्न मिळत असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. ही टोलवसुली अनधिकृत असल्याचा सार्वत्रिक आरोप आहे. नागरिकांमध्येही या टोलवसुलीबाबत प्रचंड रोष आणि मनस्ताप आहे. त्यामुळे शिवसेना विभागप्रमुख आणि विधानपरिषद गटनेते अॅड अनिल परब यांनी जीव्हीके कंपनीला पत्र लिहून हा टोल त्वरित रद्द करावा अन्यथा शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला होता. त्यानुसार अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी विमानतळाच्या बाहेर तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त आंदोलकांनी जीव्हीकेच्या विरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनानंतर शिवसेनेने टोलवसुली बंद केल्याचा दावा केला आहे. मात्र, पुन्हा टोलवसुली सुरू झाल्यास विमानतळ बंद पाडू असा धमकी वजा इशारा व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या जीव्हीके कंपनीला त्यांनी दिला. विशेष म्हणजे या टोल वसुलीविरोधात मनसेने न्यायालयात याचिका दाखल केली. विमानतळ नूतनीकरण करताना हटवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा मूळ जागी बसवण्यात यावा अशी मागणीही यावेळीं शिवसनेने केली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा