जेष्ठ नागरिकांसह सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार

 Chembur
जेष्ठ नागरिकांसह सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार

विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि जेष्ठ नागरिकांचा सोमवारी महाराष्ट्र दिनानिमित्त चेंबूरमध्ये सत्कार करण्यात आला. भाजप नगरसेविका अाशा मराठे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन सुभाषनगर येथे केले होते. 

चेंबूरमध्ये अनेक नामवंत डॉक्टर, वकील, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी त्यांच्या कामाच्या जोरावर त्यांच्यासह चेंबूरचेही नाव मोठे केले आहे. त्यामुळे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून अशा 22 व्यक्तींसह चेंबूर परिसरातील 30 जेष्ठ नागरिकांचा यावेळी भाजपा प्रवक्ते महादेव भंडारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला परिसरातील रहिवाशांसह मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.

Loading Comments