Advertisement

तिळाच्या लाडू विक्रीत यंदा घट

कोरोना या जीवघेण्या व्हायरसमुळं यंदा तिळाच्या तयार लाडूच्या विक्रीत प्रचंड घट झाली आहे.

तिळाच्या लाडू विक्रीत यंदा घट
SHARES

कोरोना या जीवघेण्या व्हायरसमुळं यंदा तिळाच्या तयार लाडूच्या विक्रीत प्रचंड घट झाली आहे. ग्राहकांनी लाडू खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळं ऐन संक्रांतीच्या मुहूर्तावर पुरेसा ग्राहकवर्ग नसल्याने विक्रेत्यांमध्ये नाराजी आहे.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तिळाचे लाडू, साखरदाणे आदी वस्तू घेऊन या विक्रेत्यांनी आपले बाकडे थाटले. परंतु मनासारखा ग्राहकवर्ग मिळत नसल्याने यंदाची संक्रांत त्यांना कडू वाटत आहे.

यंदा ग्राहकच नसल्याने संक्रांतीसाठी तयार केलेल्या लाडूची विक्री कमी झाली आहे. लाडू हाताने वळले जातात. त्यामुळे सुरक्षिततेबाबतची खात्री ग्राहकांना नाही. शिवाय, रेल्वे प्रवासावरील निर्बंधचा फटका विक्रीला बसला आहे, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

मकर संक्रांतीच्या काही दिवस आधीपासूनच बाजारपेठांमध्ये लाडूच्या गाड्या लागलेल्या असतात. दादर स्थानकाशेजारीच बाजार असल्याने एरव्ही ग्राहकांची झुंबड उडते. यंदा मात्र दिवसभरात चार-पाच किलोही लाडू विकले जात नाहीत.

Read this story in English
संबंधित विषय