चीनमध्ये (china) ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. तसेच आता भारतातही (india) ह्या विषाणूशी (virus) संक्रमित रुग्ण आढळून आली आहेत. भारतात या विषाणूशी संबंधित आठ रुग्ण संक्रमित झाली आहेत.
भारतात HMPV ची पहिली नोंद झालेल्या प्रकरणात आठ महिन्यांचे बाळ होते ज्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. तसेच तीन महिन्यांच्या मुलालाही या विषाणूची लागण झाली होती मात्र आता त्या मुलाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यानंतर अहमदाबादमध्ये दोन महिन्यांच्या मुलाची चाचणीही पॉझिटिव्ह आली.
सध्या, चीनमध्ये HMPV चा उद्रेक मोठ्या प्रमाणावर होत आहे. भारतात ह्युमन मेटापन्यूमोव्हायरसच्या (एचएमपीव्ही) आठ प्रकरणांची नोंद झाली आहे. यात कर्नाटकात दोन, गुजरातमध्ये एक तर महाराष्ट्रात दोन प्रकरणांची नोंद झाली आहे.
भारताच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बेंगळुरू आणि अहमदाबादमधील अर्भकांसह तीन ह्युमन मेटाप्न्यूमोव्हायरस (HMPV) प्रकरणांची पुष्टी केली. तसेच संबंधित रुग्णांचा कोठेही प्रवास न झाल्याचं स्पष्ट झाले आहे.
आरोग्य अधिकारी या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तसचे आरोग्य मंत्रालयाकडून कोविड-19 प्रमाणेच सावधगिरीचे मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आले आहेत.
गुजरात (gujrat) राज्याचे प्रशासन जनतेला धीर देत आहे, तर महाराष्ट्र (maharashtra) सतर्कता आणि सुरक्षा उपायांवर भर देत आहे. दिल्लीतील रुग्णालयांना HMPV शी संबंधित श्वसनाच्या आजाराबाबत सतर्क करण्यात आले आहे.
हेही वाचा