Advertisement

शिवडी किल्ला रोषणाईने लखलखणार


शिवडी किल्ला रोषणाईने लखलखणार
SHARES

मुंबईतील प्राचीन किल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवडी किल्ल्याचा परिसर आता विद्युत दिव्यांनी उजळणार आहे. या  किल्ल्यावर पर्यटकांची संख्या अधिक असल्यानं या किल्ल्याचं सुशोभिकरण करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतला आहे. त्यामुळे शिवडी किल्ला आता दिव्यांनी लखलखणार आहे.



वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना 

कळसासारखा दिसणारा शिवडी किल्ला हा प्राचीन वास्तुशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे. त्यामुळं हे प्राचीन बांधकाम पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांसह परदेशी पर्यटकही मोठ्या संख्येनं या ठिकाणी येत असतात. त्यामुळे शिवडी किल्ल्याचे सुशोभित दिव्यांनी सुशोभिकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी ८४ लाख रुपये खर्च करण्यात येत आहे.




सुशोभिकरणाची अावश्यकता 

मुंबई शहरात ऐतिहासिक वारसा जपत, आजही चांगल्या स्थितीत असलेला हा एकमेव किल्ला आहे. आजही या किल्यावर पर्यटक येणार असल्याने एक उत्तम पर्यटन स्थळ निर्माण करण्याच्या दृष्टीने सुशोभित दिव्यांनी या किल्ल्याचं सुशोभिकरण करणं आवश्यक होतं, असं स्थानिक नगरसेवक सचिन पडवळ यांनी स्पष्ट केले.

 

शिवडी किल्ल्याचा इतिहास

  • शिवडी किल्ला बहादूर खानच्या ताब्यात असताना किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पीराचा दर्गा बांधण्यात आला. 
  • १५३४च्या तहात हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात आल्यावर या किल्ल्याची डागडुजी करण्यात आली. 
  • १६७२ साली जंजिऱ्याच्या सिद्धीकडून मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर इंग्रजांनी नवीन किल्ले बांधले व जुने किल्ले मजबूत केले. 
  • परळच्या बेटाच्या पूर्व किनाऱ्यावरील टेकडीवर असलेल्या शिवडी किल्ल्याचे नूतनीकरण तसेच मजबूतीकरण इंग्रजांनी १६८० मध्ये केले होते.
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा