या रस्त्याचा वाली कोण?

 Goregaon
या रस्त्याचा वाली कोण?

मुंबई - चेंबूरच्या यशवंतनगर परिसरातल्या रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात सांडपाणी वाहत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. सर्व्हिस रोडवरील मुख्य नाला पूर्णपणे तुंबल्यामुळे हे सांडपाणी रस्त्यावर वाहतंय. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय.

याबाबत सामाजिक कार्यकर्ते नितीन नांदगावकर यांनी पालिकेला वारंवार पत्र व्यवहार केला. मात्र हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत असल्याने त्यांच्याकडे तक्रार करावी, असे उत्तर त्यांना देण्यात आले. त्यानुसार त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला देखील पत्रव्यवहार केला. मात्र अजूनही त्यांना योग्य प्रतिसाद मिळलेला नाही. 

Loading Comments