Advertisement

शारदाश्रमच्या 'इंटरनॅशनल' नावाचा प्रस्ताव फेटाळला


शारदाश्रमच्या 'इंटरनॅशनल' नावाचा प्रस्ताव फेटाळला
SHARES

दादरमधील डॉ. भवानी शंकर रोडवरील शारदाश्रम शाळेचे नाव 'एसव्हीएम इंटरनॅशनल स्कूल' असं करण्याचा प्रस्ताव शिक्षण समितीने फेटाळून लावला. या शाळेनं या ठिकाणी २६०० चौरस मीटरची मोकळी खेळाची जागा असल्याचं सांगितलं होतं. परंतू प्रत्यक्षात या ठिकाणी केवळ १२०० चौरस मीटरची जागा असल्याचं शिक्षण विभागानं स्पष्ट केलं. त्यामुळे ही चूक क्लार्कची असल्याने त्याच्याविरोधात कारवाई करण्याचा आदेश शिक्षण समितीनं दिला अाहे. 


शिक्षण विभागाला फैलावर 

शारदाश्रम विद्या मंदिर शाळा व्यवस्थापनानं या शाळेचं नाव 'एसव्हीएम इंटरनॅशनल स्कूल' असं करण्याचं पत्र महापालिका शिक्षण विभागाला दिलं. त्यानुसार या नामकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागानं समितीपुढं ठेवला होता. याबाबतचा प्रस्ताव गुरुवारी झालेल्या शिक्षण समितीत पुन्हा पुकारला असता, साईनाथ दुर्गे यांनी याविरोधात जोरदार बाजू मांडली. दुर्गे यांच्याबरोबरच सचिन पडवळ, शितल म्हात्रे आदींनीही या प्रस्तावाच्या अनुषंगाने शिक्षण विभागाला फैलावर घेतलं.


लिपिकाची चूक 

मागील बैठकीत हा प्रस्ताव मंजुरीला आला असता ही शाळा आंतरराष्ट्रीय बनवून त्यांचे नामकरण 'एसव्हीएम इंटरनॅशनल स्कूल' असं करण्यास शिक्षण विभागाने परवानगी  दिली आहे, असा गौप्यस्फोट साईनाथ दुर्गे आणि जितेंद्र पडवळ यांनी केला होता. त्यामुळे या बिट ऑफिसरला त्वरीत निलंबित करण्याचे निर्देश शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी दिले होते.

परंतू, गुरुवारी झालेल्या बैठकीत या शाळेसाठी २६१८ चौरस मीटरचं मैदान दाखवल्याने त्यांना परवानगी दिली होती, असं शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं होतं. पण प्रत्यक्षात ही १२०० चौरस मीटर असल्याचा खुलासा शिक्षण विभागाने या बैठकीत केला.

लिपिकाकडून ही चूक झाल्याचं प्रशासनानं कबूल केलं. त्यामुळे या अधिकाऱ्यावर कारवाई करून हा प्रस्ताव फेटाळत तो समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी दप्तरी दाखल करून टाकला. या शाळेला महापालिकेच्यावतीने परवानगी दिली होती. ती परवानगी मागील आठवड्यात रद्द करण्यात आली होती. त्यामुळे हा प्रस्ताव फेटाळला जाणार हे उघड होतं.



हेही वाचा - 

पावसाळ्यात कोकण रेल्वेचा वेग मंदावणार

'लॉ' अभ्यासक्रमाच्या तुकड्या वाढणार






संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा