Advertisement

पावसाळ्यात कोकण रेल्वेचा वेग मंदावणार


पावसाळ्यात कोकण रेल्वेचा वेग मंदावणार
SHARES

यंदाच्या पावसाळ्यातही कोकण रेल्वेचा वेग मंदावणार असून त्याविषयीचं परिपत्रक नुकतंच कोकण रेल्वेकडून जाहीर करण्यात आलं आहंत्याशिवाय पावसाळ्यात कोकणात जाणाऱ्या काही गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. हा बदल हा १० जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीसाठी करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या कालावधीत अनेक चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात जातात. त्यामुळे कोकण रेल्वेद्वारे जाहीर केलेलं हे वेळापत्रक गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी अतिशय महत्त्वाचं असणार आहे.


किती असेल वेग? 

कोकण रेल्वेच्या विविध भागांत जाणाऱ्या गाडय़ांचा सामान्य वेग हा ताशी ११० किमी इतका असतो. मात्र पावसाळा सुरू झाल्यावर हाच वेग ताशी ४० किमीनं कमी करण्यात येतो. त्यामुळे रेल्वेचा वेग ताशी ७० ते ७५ इतका असेल


कोकण रेल्वेचे मान्सून कालावधीतील वेळापत्रक


गाडी नंबरनावसुटण्याचं ठिकाणवेळ
१०१०४ मडगाव-सीएसएमटी मांडवी एक्स्प्रेसमडगावसकाळी ९.१५ ऐवजी सकाळी ८.३० वाजता 
११००४सावंतवाडी-दादर राज्यराणी एक्स्प्रेससावंतवाडीसकाळी .१५ ऐवजी सकाळी ८.३० वाजता
१२०५२मडगाव-दादर जनशताब्दी एक्स्प्रेसमडगावदुपारी .३० ऐवजी दुपारी १२ वाजता
१२६२०मंगळुरू-एलटीटी मत्स्यगंधा एक्स्प्रेसमंगळुरूदुपारी .३५ ऐवजी दुपारी १२.५० वाजता 
२२९०७मडगाव-हापा एक्स्प्रेस मडगावसकाळी १०.४० ऐवजी सकाळी ७ वाजता
१२७४१वास्को-पाटणा एक्स्प्रेसवास्को द गामासायंकाळी .०५ ऐवजी सायंकाळी ६ वाजता
१०२१५मडगाव-एर्नाकुलम एक्स्प्रेसमडगावरात्री .३० ऐवजी रात्री ९ वाजता
११०८६मडगाव-एलटीटी डबलडेकर एक्स्प्रेसमडगाव सकाळी ६ ऐवजी सकाळी .३० वाजता
 ५०१०१मडगाव-रत्नागिरी पॅसेंजरमडगावसायंकाळी .१० ऐवजी रात्री ८ वाजता


कोकण भागात मोठ्या प्रमाणावर पावसाचा जोर असतो. त्यामुळे या भागात दरड कोसळण्याचं प्रमाण देखील अधिक असतंया दरडी बाजूला काढण्यासाठी खूप वेळ लागत असल्यानं त्या कालावधीत प्रवाशांचे अतोनात हाल होतातत्यामुळे कोकण रेल्वेवरील काही गाड्यांचा वेग मंदावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

- निलेश नाईकरेल्वे अधिकारी


२४ तास कर्मचारी कार्यरत 

पावसाळ्याच्या कालावधीत कोकण रेल्वे मार्गावर काही ठिकाणी दरड तसेच माती कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असतात. त्यामुळे रेल्वे सेवा काही कालावधीसाठी ठप्प होतं. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने पावसाळा सुरू होण्याआधीच धोकादायक दरडी कापल्या आहेत.

मात्र, तरीही सुरक्षिततेचा उपाय म्हणून सर्वच धोकादायक ठिकाणी रेल्वे गँगमॅन तसेच इतर कर्मचारी २४ तास कार्यरत असणार आहेत. त्यामुळे दरड कोसळण्यासारखी कोणतीही घटना घडल्यास रेल्वे प्रशासनाला तात्काळ माहिती समजू शकणार आहे. तसंच त्यावर तात्काळ उपाययोजनाही करता येणार आहेत



हेही वाचा-

रेल्वेप्रवासात मर्यादेपेक्षा जास्त सामान न्याल तर...



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा