Advertisement

'लॉ' अभ्यासक्रमाच्या तुकड्या वाढणार


'लॉ' अभ्यासक्रमाच्या तुकड्या वाढणार
SHARES

'लॉ' अभ्यासक्रमाच्या तुकड्या वाढवण्याच्या निर्णयाला राज्य सरकारने हिरवा कंदिल दाखवला आहे. बुधवारी उच्च आणि तंत्र शिक्षण मंडळाने याबाबत घोषणा केली. शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात 'लॉ'साठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निश्चितच दिलासा मिळणार आहे.


म्हणून हा निर्णय घेतला

दरवर्षी लॉ शाखेसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या शैक्षणिक वर्षात 'लॉ'च्या पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता प्रतितुकडी ६० विद्यार्थी इतकी होती. तर यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून 'लॉ'च्या पदवी अभ्यासक्रमांसाठी तीन आणि पाच वर्ष 'लॉ'च्या अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षाच्या तुकड्यांची मर्यादा पाच असणार आहे.


तुकड्यांची मर्यादा

२०१९-२० या शैक्षणिक वर्षामध्ये पाच वर्षांच्या 'लॉ' अभ्यासक्रमाच्या एकूण तुकड्यांची कमाल मर्यादा २५ असणार असून, तीन वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या तुकड्यांची मर्यादा १५ राहणार आहे. परंतु, या तुकड्यांची वाढ करण्यासाठी 'लॉ' च्या कॉलेजांना सरकारची परवानगी घेणं अनिर्वाय असणार आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा