Advertisement

नॅशनल पार्क हरण मृत्यू प्रकरण: चालकाविरोधात गुन्हा दाखल

बोरिवली येथील संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये हरणाला चिरडल्याप्रकरणी कारच्या चालकाविरूद्ध आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नॅशनल पार्क हरण मृत्यू प्रकरण: चालकाविरोधात गुन्हा दाखल
SHARES

बोरिवली येथील संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये हरणाला चिरडल्याप्रकरणी कारच्या चालकाविरूद्ध आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चालकाचे नाव एस. जॉर्ज आहे.  जॉर्ज याने हरणाला पाहून धडक दिली असं सांगितलं जात आहे. 

मागील बुधवारी ही घटना घडली. नॅशनल पार्कमध्ये एका एसयुव्ही कारने हरणाला धडक दिली. यामध्ये हरणाचा मृत्यू झाला. त्यानंतर ही कार ताब्यात घेण्यात आली. ही कार शिवसेना खासदार राजेंद्र गावीत यांची असल्याची उघडकीस आलं. याबाबत संजय गांधी नॅशनल पार्कचे संचालक अन्वर अहमद म्हणाले, की चालकाविरूद्ध वन्यजीव अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा चालक नॅशनल पार्कच्या नियमानुसार निश्चित केलेेल्या वेगापेक्षा अधिक वेगाने गाडी चालवत होता. नॅशनल पार्कमध्ये वेग मर्यादा ताशी २० किलोमीटर आहे. 

२८ नोव्हेंबर दिवशी संध्याकाळी ६ ते ६.२० च्या सुमारास ही घटना घडली आहे. एसयुव्ही कार संजय गांधी नॅशनल पार्कच्या मुख्य दरवाज्याकडे जात होती. त्यावेळेस गांधी टेकडीजवळ हरणाला गाडीची धडक बसली. मुख्य द्वारावर चालकाने याप्रकरणी माहिती दिली. यानंतर हरणाला नॅशनल पार्कच्या पशू इस्पितळात दाखल करण्यात आलं. मात्र तेथे हरणाला मृत घोषित करण्यात आले.हेही वाचा -

माहिममध्ये एका सुटकेसमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

अपंग विक्रेत्याला आरपीएफ जवानांकडून मारहाण
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा