अपंग विक्रेत्याला आरपीएफ जवानांकडून मारहाण

इतर फेरीवाल्यांप्रमाणे त्यालाही पैसे द्यावे लागतील असे आरपीएफ जवानाचे म्हणणे होते. सिद्धार्थने पुढच्या स्टेशनवर पैशे देतो असे सांगितले. मात्र आरपीएफ त्याचे काही एक ऐकून घेण्यास तयार नव्हते.

अपंग विक्रेत्याला आरपीएफ जवानांकडून मारहाण
SHARES

मुंबईजवळील शहापूर स्थानकाजवळ लांब पल्याच्या गाड्यात पाणी विक्री करणाऱ्या अपंग तरुणाने हप्तान दिल्याच्या रागातून दोन आरपीएफ पोलिसांनी त्याला मारहाण केल्याची घटना पुढे आली आहे. याबाबत त्या अपंग तरुणाने आरपीएफ जवानांविरोधात कल्याण जीआरपी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलिस तपास करत आहेत. मात्र या घटनेमुळे आरपीएफ जवानांची दादागिरी पुन्हा एका समोर आली आहे.

शहापूरमध्ये राहणारा सिद्धार्थ साहू हा२० वर्षीय तरुण एका हाताने अपंग आहे. त्याच्यावरच घर चालत असल्यामुळे कसारा स्थानकावर तो पाणीविक्री करतो. काही दिवसांपूर्वी तो एक्सप्रेसमध्ये पाणी विकत असताना. दोन आरपीएफ जवानांनी त्याला रोखले. आरपीएफच्या एका जवानाने त्याच्याकडून पैशाची मागणी केली. इतर फेरीवाल्यांप्रमाणे त्यालाही पैसे द्यावे लागतील असे आरपीएफ जवानाचे म्हणणे होते. सिद्धार्थने पुढच्या स्टेशनवर पैशे देतो असे सांगितले. मात्र आरपीएफ त्याचे काही एक ऐकून घेण्यास तयार नव्हते. अखेर कसारा स्थानकात ट्रेन पोहचल्यानंतर आरपीएफचे दोन जवान सिद्धार्थला एका मालगाडीच्या मागे घेऊन गेले. त्याठिकाणी त्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप सिद्धार्थने केला आहे.  हा मारहाणीचा व्हिडिओ एका सुजान नागरिक त्याच्या कॅमेऱ्यात कैद करत असल्याचे पाहून जवानांनी सिद्धार्थला सोडून दिले.

या प्रकरणी कल्याण जीआरपीकडे सिद्धार्थ याने तक्रार केली असून जीआरपीने चौकशी सुरु केली आहे. कायदेशीर कारवाई केली जाईल असा कल्याण जीआरपीचे म्हणणे आहे. या प्रकरणी आरपीएफने सुद्धा सिद्धार्थ विरोधात मारहाणीची तक्रार केली आहे. सिद्धार्थ जर अवैधपणे गाडीत पाणी विक्री करीत होता. तर त्याच्या विरोधात कारवाई केली जाणे अपेक्षित होते. मात्र त्याला बेदम मारहाण करणे. त्याच्याकडे पैशाची मागणी करणे हे कोणत्या कायद्यात बसते असा सवाल यामुळे उपस्थित केला जात आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा