Advertisement

मुंबईत दुकानदारांचा असहकार?

मुंबईसह राज्यातील सर्व दुकाने सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुकानं उघडणार असल्याचं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीजनं जाहीर केलं आहे.

मुंबईत दुकानदारांचा असहकार?
SHARES

मुंबईसह राज्यातील सर्व दुकाने सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुकानं उघडणार असल्याचं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीजनं जाहीर केलं आहे. मात्र, जीवनावश्क वस्तू वगळता अन्य दुकाने ३० तारखेपर्यंत बंद ठेवण्याचा राज्य शासनाचा आदेश असला तरी व्यापारी वर्ग आपली दुकानं सोमवारपासून सुरू करणार आहे. परिणामी, सरकार विरुद्ध व्यापारी असा संघर्ष होण्याची चिन्हं आहेत.

मुंबईत वाढत असलेला कोरोनाचा (coronavirus) प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारनं कडक निर्बंध जाहीर केले आहे. मात्र, हे निर्बंध लॉकडाऊन प्रमाणेच असल्यानं अनेकांवर त्याचा परिणाम झाला. मागील आठवड्यात या निर्बंधांमुळं सर्व दुकानं बंद करण्याचे आदेश पोलिसांनी दिल्यामुळं सबंध व्यापारी वर्ग रस्त्यावर उतरला होता. मुंबईसह राज्यभरातील सर्व व्यापारी वर्ग दुकानं उघण्याची मागणी करत आंदोलन करत होते. शिवाय, शुक्रवारपासून सर्व दुकानं उघडण्याचा इशारा व्यापारी संघटनेनं दिला होता. परंतु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या आवाहनानंतर सोमवारपर्यंत दुकानं उघडण्याचं व्यापाऱ्यांनी टाळलं.

कोरोनाची साखळी तोडण्याकरिता राज्यातील जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य सर्व प्रकारची दुकानं ३० तारखेपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश राज्य सरकारनं जारी केला आहे. या विरोधात व्यापारी रस्त्यावर उतरले. ठिकठिकाणी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी व्यापाऱ्यांना पाठबळ दिले. लॉकडाऊनबाबत सरकारचा अद्याप काही निर्णय झालेला नाही. राज्यात १ किंवा २ आठवड्यांची लॉकडाऊन लागू होऊ शकते. त्यामुळं सर्वसामान्य जनतेला जीवनावश्यक वस्तूंप्रमाणेच अन्य वस्तूंची खरेदी करता यावी म्हणून सोमवारपासून सकाळी १० ते सायंकळी ५ वाजेपर्यंत सर्व प्रकारची दुकानं उघडी ठेवली जातील.

कोरोनाचं (covid 19) संक्रमण रोखण्यासाठीच्या सर्व निकषांचं कडकपणे पालन करून आपले व्यापार सुरू करणार असल्यानं जिल्हा प्रशासनानं राज्यात सर्वत्र व्यापाऱ्यांना सहकार्य करावं असं आवाहनही संघटनेच्या वतीनं करण्यात आलं आहे. मास्कशिवाय ग्राहकांना दुकानांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा