Advertisement

दादरमधील पुरंदरे मैदानावरून शिवसेना आक्रमक


दादरमधील पुरंदरे मैदानावरून शिवसेना आक्रमक
SHARES

दादरमधील पुरंदरे मैदानाचं नुतनीकरण करताना त्याठिकाणी महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांसाठी क्लब हाऊस बनवण्यात येत आहे. पण क्लब हाऊस बनल्यास स्थानिक मुलांना खेळण्यासाठी असलेलं मोकळे मैदान हातचं जाणार आहे. आता याविरोधात शिवसेनेने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेऊन मैदान बचावचा नारा दिला आहे.


मुलांची हक्काची जागा जाणार

माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी स्थापत्य शहर समितीच्या बैठकीत हरकतीचा मुद्दा उपस्थित करून दादर नायगावमधील पुरंदरे मैदान हे कोणत्याही परिस्थिती डॉक्टरांच्या क्लब हाऊस बांधण्यास दिले जावू नये, अशी मागणी केली आहे. पुरंदरे मैदानाचा वापर यापूर्वी डॉक्टरांकडून केवळ एका दिवसासाठी केला जात होता. तर उर्वरीत सर्व दिवस या मैदानाचा वापर स्थानिकांकडून केला जात होता. परंतु आता क्लब हाऊस बनवल्यास या भागातील मुलांची खेळण्यासाठीची हक्काची जागाही जाणार आहे.


तर शिवसेनाही रस्त्यावर उतरेल

केईएम रुग्णालतील डॉक्टरांसाठी रुग्णालयात कॅरमसह अन्य खेळण्याची सुविधा उपलब्ध आहे. मग त्यांना या मैदानातील जिमखान्याची गरज का असा प्रश्न करत भविष्यात याविरोधात जर जनता रस्त्यावर उतरल्यास त्या जनतेसोबत शिवसेनाही आंदोलनासाठी रस्त्यावर उतरेल, असा इशारा श्रद्ध जाधव यांनी दिला आहे. दरम्यान हा हरकतीचा मुद्दा स्थापत्य समिती शहर अध्यक्षा अरुंधती दुधवडकर यांनी राखून ठेवला.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा