महापालिका नगर अभियंतापदी श्रीनिवास मांडगुळकर

  Mumbai
  महापालिका नगर अभियंतापदी श्रीनिवास मांडगुळकर
  मुंबई  -  

  मुंबई महापालिकेच्या नगर अभियंतापदी असलेल्या प्रकाश कदम यांची प्रमुख अभियंता (दक्षता) पदी बदली करून त्यांच्या जागी मलनि:सारण विभागाचे उपप्रमुख अभियंता श्रीनिवास रंगराव मांडगुळकर यांना बढती देण्यात आली आहे. मांडगुळकर यांची उपायुक्तपदी नियुक्ती करून त्यांना या पदावर बढती देण्यात आली आहे.

  महापालिकेतील उपायुक्त प्रकाश कदम, मांडगुळकर आणि माने यांच्या बदलीचे आदेश महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी बुधवारी जारी केले आहेत. उपायुक्त प्रकाश कदम यांना नगरअभियंता पदावरून हटवून प्रमुख अभियंता (दक्षता)पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापदावरील एम.व्ही. पवार हे सेवानिवृत्त झाल्यामुळे हे पद रिक्त होते. त्यामुळे यापदावर कदम यांची वर्णी लावून त्यांच्या रिक्त जागेवर मांडगुळकर यांना उपायुक्त म्हणून बढती देत नियुक्ती करण्यात आली आहे.

  तर इमारत देखभाल विभागाच्या प्रमुख अभियंतापदी माने यांची बदली करण्यात आली आहे. यापूर्वी माने हे शाळा व पायाभूत सेवा विभागात कार्यरत होते. बुधवारी या तिघांच्या बदलीचे आदेश महापालिका आयुक्तांनी जारी केल्यानंतर या तिघांनी आपला पदभार गुरुवारपासून स्वीकारला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.