Advertisement

मुंबई: सिद्धिविनायक मंदिराकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात

सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून प्रसिद्धीपत्रक काढत याबाबत माहिती देण्यात आली आहे.

मुंबई: सिद्धिविनायक मंदिराकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात
SHARES

राज्यातील (maharashtra) अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. काही ठिकाणी शेती वाहून गेली आहे.

या महाप्रलयामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. लहान मुलांची वह्या, पुस्तकं सर्व वाहून गेले आहेत. अनेक स्वप्न महापुराने वाहून नेले आहेत. त्यामुळे पूरग्रस्तांना मदतीची नितांत गरज आहे.

पूरग्रस्त भागातील नागरिकांना पुन्हा उभं करणं ही नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या परिने प्रयत्न करताना दिसत आहे.

विशेष म्हणजे मोठमोठ्या मंदिर ट्रस्टकडून कोट्यवधी रुपयांची मदत (help) पूरग्रस्तांना (drought affected) केली जात आहे. मुंबईतील (mumbai) लालबाग गणेशोत्सव सार्वजनिक मंडळांने मदत जाहीर केली. तसेच पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराकडूनही मदत जाहीर झाली.

तसेच शिर्डीच्या साईबाबा मंदिर संस्थानकडूनही मदत जाहीर झाली. शेगावच्या गजानन महाराज मंदिर ट्रस्टकडून मदत जाहीर झाली. यानंतर आता मुंबईच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून (siddhivinayak temple trust) मदत जाहीर झाली आहे.

मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून राज्यातील पूरग्रस्तांना 10 कोटींची मदत जाहीर झाली आहे. सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून प्रसिद्धीपत्रक काढत याबाबत माहिती देण्यात आली आहे.


हेही वाचा

ट्रेनमधून फेकलेल्या नारळामुळे एका व्यक्तीचा मृत्यू

'या' रिंग रोडमुळे बदलापूरहून थेट पनवेल गाठता येणार

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा