Advertisement

ट्रॅफिक फ्री मुंबईसाठी स्वाक्षरी रॅली


ट्रॅफिक फ्री मुंबईसाठी स्वाक्षरी रॅली
SHARES

दहिसर - मुंबईला ट्रॅफिक फ्री बनवण्यासाठी भाजपाच्या कोकण वाहतूक विभागाचे अध्यक्ष रोशन शेख यांनी स्वाक्षरी रॅलीचं आयोजन केलं होतं. या रॅलीची दहिसर चेकनाक्यापासून सुरुवात झाली. तसंच मुंबई ट्रॅफिक पोलिसांची संख्या वाढवावी, पोलीस चौकींची संख्या वाढवावी, ट्रॅफिक पोलिसांच्या समस्येसाठी समिती स्थापन केली जावी, ड्युटी दरम्यान सुरक्षेसाठी पोलिसांना पिस्तुल बाळगण्याची परवानगी द्यावी, त्यांची कामाची वेळ कमी केली जावी, त्यांच्या पगारात वाढ करावी आणि विभागाच्या प्रगतीसाठी वेगवेगळी तंत्र उपलब्ध करुन द्यावी अशा अनेक मागण्या या स्वाक्षरी रॅली दरम्यान करण्यात आल्या. तसंच या सर्व मागण्यांसाठी आमदार प्रवीण दरेकर यांची भेट घेणार असल्याचंही सांगण्यात आलं. या रॅलीत स्थानिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा