Advertisement

शिवडीत प्रार्थनास्थळ वाचवण्यासाठी सह्यांची मोहीम


शिवडीत प्रार्थनास्थळ वाचवण्यासाठी सह्यांची मोहीम
SHARES

शिवडी - प्रार्थनास्थळाचे सबळ पुरावे सादर केल्यानंतर शिवडी (प.) येथील टी. जे. रोडवरील कलेश्वरनाथ या प्रार्थनास्थळावरील कारवाईला पालिकेने केवळ 10 दिवसांची तोंडी स्थगिती दिली आहे. तर 1931 साली उभारण्यात आलेले हे प्रार्थनास्थळ जमीनदोस्त होऊ देणार नसल्याचा पावित्रा येथील स्थानिकांनी घेतला आहे. यासाठी इथल्या स्थानिकांनी सह्यांची मोहीम राबवण्यास सुरूवात केली आहे. या मोहिमेत तब्बल 5 हजार 247 लोकांनी सह्या करून आपला सहभाग नोंदवला आहे.महापालिका एफ दक्षिण विभागाच्या वतीने शिवडी (प.) येथील टी. जे. रोडवरील कलेश्वरनाथ या प्रार्थनास्थळावर 23 मार्चला तोडक कारवाई केली जाणार होती. परंतु आता सबळ पुरावे सादर केल्यानंतर पालिकेने 10 दिवस या कारवाईला स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 1960 सालापूर्वी बांधण्यात आलेल्या प्रार्थना स्थळांचा अ गटात समावेश केल्याने 1960 पूर्वीच्या प्रार्थनास्थळांना अभय मिळाले आहे. शिवडीतील 1931 साली उभारण्यात आलेल्या कलेश्वरनाथ प्रार्थना स्थळाला महापालिकेकडून 2015 साली अ गट दिला गेला आहे. असे असतानाही महापालिकेकडून याच प्रार्थनास्थळाचा 2016 साली ब गटात समावेश केल्याची नोटीस बजावण्यात आल्याचे अॅड. मनोहर राजपूत यांनी सांगितले. तर करवसूली 'अ' गटाप्रमाणे घेत असताना ब गटात समावेश करून पालिकेद्वारे खोटी माहिती दिल्याने हे सर्व घडत आहे, असे पुजारी ईश्वरगिरी यांचे म्हणणे आहे.

सदरील प्रार्थनास्थळाबाबत चुकीची माहिती देण्याऱ्या पालिकेविरोधात येथील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून प्रार्थनास्थळ वाचवण्यासाठी सह्यांची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेस येथील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून लोकप्रतिनिधीही यात मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा