डॉक्टर खोटं बोलल्याचा इमानच्या बहिणीचा आरोप

  Mumbai
  डॉक्टर खोटं बोलल्याचा इमानच्या बहिणीचा आरोप
  मुंबई  -  

  जगातील सर्वात लठ्ठ महिला इमान सध्या मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचार घेत आहे. मात्र ती सध्या खूप आजारी आहे, शिवाय डॉक्टर तिची कोणतीही काळजी घेत नाहीत, असा खळबळजनक आरोप इमानची बहिण शायमा सेलिमने केला आहे. 

  मुंबईतील सैफी रुग्णालयात इमान अहमद वजन कमी करण्यासाठी उपचार घेत आहे. डॉ. मुझफ्फल लकडावाला यांच्या देखरेखीखाली ती उपचार घेत आहे. डॉक्टरांनी तिची व्यवस्थित काळजी घेत वजन कमी होईल, असं आश्वासन दिलं होतं. मात्र इमानचं आयुष्य उध्वस्त झालं आहे. डॉक्टर आमच्याशी खोटं बोलल्याचा आरोप तिच्या बहिणीने  केला आहे. 

  सौजन्य - डीएनए इंडिया

  [हे पण वाचा - इमान फिरतेय व्हिलचेअरवरून]

  उपचारासाठी इजिप्तहून 11 फेब्रुवारी रोजी मुंबईत आलेल्या इमानचे वजन आधी 500 किलो होतं. पण आता त्यात 262 किलोंची घट होऊन अवघ्या 238 किलोंवर आलं आहे. लकडावाला यांनी आधी इमानच्या डाएटमध्ये बदल करत तिचं वजन 100 किलोंनी कमी केलं होतं. त्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करुन आणखी वजन कमी करण्यात यश आल्याची माहिती काही दिवसांपूर्वी दिली होती.

  [ही बातमी सुद्धा वाचा - इमाननं घटवलं दोन महिन्यात 242 किलो वजन!]

  इमानची बहिण शायमा सेलिमने केलेल्या आरोपाबाबत डॉ. मुझफ्फल लकडावाला यांनीही त्यांची बाजू मांडली आहे. "आम्हाला जे काही करणे शक्य होते ते आम्ही केले आहे. आता तीने घरी जाऊन आम्ही सांगितल्याप्रमाणे ट्रिटमेंट घेतली पाहिजे. इमानला कायमस्वरूपी येथे ठेवता येणार नाही, ही बाब तीच्या बहिणीला समजली पाहिजे", असे ते म्हणाले. 

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.