Advertisement

वरळीतील कोरोना केंद्रातील ३३ बेड्सच्या आयसीयूवर ६५ लाखांचा खर्च

या इंटिग्रेटेड आयसीयू केअर युनिट रिमोट मॉनिटरींग आणि सर्वेलियन्स सिस्टीमवर एकूण ६४ लाख ३५ हजारांचा खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आहे.

वरळीतील कोरोना केंद्रातील ३३ बेड्सच्या आयसीयूवर ६५ लाखांचा खर्च
SHARES

महापालिकेच्या जी दक्षिण विभागातील वरळीतील नॅशनल स्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्स ऑफ इंडियामध्ये (एनएससीआय) कोरोना केंद्र उभारण्यात आलं आहे. या कोरोना केंद्रात ३३ खाटांचे आयसीयू केअर युनिट बनवण्यात आले आहे. या इंटिग्रेटेड आयसीयू केअर युनिट रिमोट मॉनिटरींग आणि सर्वेलियन्स सिस्टीमवर एकूण ६४ लाख ३५ हजारांचा खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आहे.

राज्यातील सर्वांत जास्त कोरोना रुग्ण मुंबईत आढळून येत असल्यानं महापालिकेनं आपल्या सर्व रुग्णालयांमध्ये कोरोनावरील उपचारावरील सुविधा उपलब्ध करून दिली. त्यासाठी वरळी एनएससीआय, महालक्ष्मी रेसकोर्स, बीकेसी, दहिसर, मुलुंडसह भायखळा आणि भांडुपमध्ये रिचडसन अँड क्रुडास कंपनीच्या जागेत समर्पित कोरोना केंद्र उभारण्यात आलं आहे.

एनएससीआय कोरोना केंद्रात ५०० खाटांचं कोरोना काळजी केंद्र सुरुवातीला सुरु करण्यात आले होते. त्यानंतर विस्तारित सुविधा म्हणून आणखी १५० अशा प्रकारे एकूण ६५० खाटांची क्षमता येथे वापरात आणली. पण, त्याबरोबरच त्यात वाढ करुन ४० खाटांची अतिदक्षता उपचारांची सुविधा अर्थात आयसीयू बेड सुविधा देण्याचा निर्णय घेतला होता.

प्रत्यक्षात तिथे ३३ खाटांची आयसीयू सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी स्थायी समितीने दिलेल्या अधिकारानुसार अतिरिक्त आयुक्तांनी याच्या खरेदीसाठी ६४ लाख ३५ हजार रुपयांचा खर्च केला आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement