• स्कायवॉकला भगदाड
SHARE

दहिसर - दहिसर पूर्वेकडून पश्चिमेकडील विठ्ठल मंदिरकडे जाणाऱ्या स्कायवॉकला भगदाड पडले आहे. हा स्कायवॉक जागोजागी तुटला असून, येथून जायचे असल्यास पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागते. पाच वर्षांपूर्वी दहिसर पूर्वेतील एसव्ही रोड, संमेलन हॉटेल येथून रेल्वेस्टेशन आणि पश्चिमेतील विठ्ठल मंदिरपर्यंत जाण्यासाठी हा स्कायवॉक बांधण्यात आला होता. मात्र योग्य देखभालीअभावी त्याची दुरवस्था झाली आहे. मात्र प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या