Advertisement

कुकरवर स्लॅब पडून ४ महिन्यांची गरोदर महिला भाजली


कुकरवर स्लॅब पडून ४ महिन्यांची गरोदर महिला भाजली
SHARES

पोलीस वसाहतीतील घरांची दुरावस्था झाल्याचं पोलीस खात्यातील वरिष्ठांपासून ते सरकारी बाबू आणि मंत्र्यापर्यंत सगळ्यांनाच माहीत आहे. पण यापैकी कुणालाही अद्याप या वसाहतींची डागडुजी करण्याचं सुचलेलं नाही. याच दुरावस्थेचा फटका काळाचौकी पोलीस वसाहतीत राहणाऱ्या एका गरोदर महिलेला बसला आहे. ही महिला काम करत असताना स्वयंपाक घरातील स्लॅब अचानक गॅसवरील कुकरवर कोसळला, जोरदार झटक्यानं कुकरचं झाकण उघडून ही महिला भाजली.

गावदेवी पोलीस ठाण्यात हवालदार असलेले प्रभाकर चव्हाण अनेक वर्षांपासून काळाचौकी येथील पोलीस वसाहतीत रहातात. त्यांची मुलगी कोमल (२४) ही गरोदर असल्यानं सध्या माहेरी आली आहे. गुरुवारी रात्री कोमल स्वयंपाक घरात काम करत असताना स्वयंपाक घरातील स्लॅब अचानक कोसळला. हा स्लॅब थेट कुकरवर कोसळल्याने कुकर उघडून आत शिजत असलेला भात कोमल यांच्या अंगावर उडाला. या प्रकारात त्या भाजल्या. सुदैवाने त्यांची प्रकृती ठिक असली, तरी त्यांना मानसिक धक्का बसल्याचं त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं.  



विशेष म्हणजे ज्या पोलीस हवालदाराचं हे घर आहे, त्यांनी बऱ्याच वेळा आपल्या वरिष्ठांच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाला दुरूस्तीसाठी पत्र लिहिली आहेत. पण आजतागायत या पत्राची दखल घेण्यात आलेली नाही.


मी सार्वजनिक बांधकाम विभागाला पात्र पाठवून परिस्थीची जाणीव करून दिली होती. पण या विभागाने माझ्या पत्राची साधी दखलही घेतली नाही. मी ड्युटीवर असतो. त्यामुळे घरात कधी काय होईल? अशी भीती माझ्या मनात कायम असते.

- प्रभाकर चव्हाण, हवालदार



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा