Advertisement

कांदिवली, बोरिवली आणि दहिसरमध्ये होतेय 'स्मार्ट हेलमेट' स्क्रिनिंग

स्मार्ट हेल्मेट स्क्रिनिंगद्वारे थोड्या वेळात जास्तीत जास्त लोकांची स्क्रीनिंग करता येते ते ही ठराविक अंतर राखून.

कांदिवली, बोरिवली आणि दहिसरमध्ये होतेय 'स्मार्ट हेलमेट' स्क्रिनिंग
SHARES

मुंबईच्या पश्चिम उपनगरात कोरोना रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. पालिकेनं कोरोना रूग्णांची संख्या नियंत्रित करण्यासाठी या भागात मास स्क्रीनिंग आणि फीव्हर क्लिनिकही सुरू केले आहेत. यासह आता पालिकेनं या भागांमध्ये स्मार्ट हेल्मेट स्क्रीनिंग देखील सुरू केली आहे. या स्मार्ट हेल्मेट स्क्रिनिंगद्वारे थोड्या वेळात जास्तीत जास्त लोकांची स्क्रीनिंग करता येते ते ही ठराविक अंतर राखून.

पालिकेच्या ताज्या आकडेवारीनुसार, मुंबईतील बोरिवली भागातील कोरोना रुग्णांची संख्या कमी वेळात दुप्पट होत आहे. पालिकेनंही या भागात कडक लॉकडाउन लागू केला आहे.

बुधवारी राज्यात ३ हजार ६०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रूग्णांचा बरा होण्याचा दर ५५.३६ टक्के आहे आणि आतापर्यंत एकूण संख्या १ लाख ५२ हजार ६१३ वर पोहोचली आहे. दरम्यान, बुधवारी कोरोनाच्या ७ हजार ९७५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. सध्या राज्यात १ लाख ११ हजार रूग्ण उपचार घेत आहेत.

आतापर्यंत पाठवलेल्या १४ लाख ८ हजार ९०१ नमुन्यांपैकी २ लाख ७५ हजार ६४० नमुने पॉझिटिव्ह (19.56 टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख ८ हजार ३७३ नागरिक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४३ हजार ३१५ नागरिकांना संस्थात्मक क्वारंटाईन केलं गेलं आहे.



हेही वाचा

Exclusive खळबळजनक! विलगीकरणातून कोरोनाची लक्षणे असलेल्या आरोपींचे पलायन

दिवसभरात ५५२७ जणांची कोरोनावर मात, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६३ टक्के

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा