इंदू मिलची जमीन राज्य सरकारकडे हस्तांतरीत

 Nariman Point
इंदू मिलची जमीन राज्य सरकारकडे हस्तांतरीत
इंदू मिलची जमीन राज्य सरकारकडे हस्तांतरीत
See all
Nariman Point, Mumbai  -  

मुंबई - इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने पुढचे पाऊल टाकले आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती ईराणी यांच्या उपस्थितीत इंदू मिलची जागा महाराष्ट्र शासनाला हस्तांतरित करण्या संदर्भातील कागदपत्रे हस्तांतरित करण्यात आली. पंतप्रधानांनी इंदू मिलची जागा महाराष्ट्र शासनाला हस्तांतरित करण्याबाबत तत्वत: मंजूरी दिली होती. मात्र इंदू मिलची जागा कायदेशीररीत्या महाराष्ट्र शासनाच्या नावावर हस्तांतरित झालेली नव्हती. राज्य शासनाने सदर जागेच्या मोबदल्यामध्ये राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळास हस्तांतरणीय डीटीआर देणार आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये केंद्र आणि राज्यातील भाजपाचे मंत्री उपस्थित होते. मात्र एकाही शिवसेनेच्या मंत्र्याला या बैठकीमध्ये बोलावण्यात आले नाही. 14 एप्रिलला चैत्यभूमीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाबाबतही मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती तेव्हाही मुंबई महापौरांना अंधारात ठेवले होते. श्रेयवादाच्या लढाईत छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या भूमीपूजन कार्यक्रमाच्यावेळीही भाजपाने शिवसेना आणि शिवसंग्राम पक्षांना डावलण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली होती.

Loading Comments