Advertisement

माहीम कॉजवे परिसरात आढळला ८ फूट लांबीचा अजगर

मंगळवारी सकाळी ७.०९ वाजताच्या सुमारास माशाच्या जाळ्यात अडकलेला साप आढळला.

माहीम कॉजवे परिसरात आढळला ८ फूट लांबीचा अजगर
SHARES

मुंबईतील वर्दळीच्या ठिकाणी मागील काही दिवसांपासून सापांचं (snake) दर्शन घडत आहे. मागील आठवड्यात दादरच्या शिवाजी पार्क परिसरात ४.५ फुटाचा विषारी साप आढळला ही घटना ताजी असतानाच मंगळवारी माहीमच्या कॉजवे (mahim) येथील रेती बंदर परिसरात अजगर जातीचा साप आढळला आहे. मंगळवारी सकाळी ७.०९ वाजताच्या सुमारास माशाच्या जाळ्यात अडकलेला साप आढळल्याची माहिती सर्पमित्र अतुल कांबळे यांनी दिली.

माहीम काॅजवे येथील रेती बंदरावर परिसरात अजगर आढळल्याचं समजताच तेथील राहिवाशांनी सकाळी वाईलड लाईफ एँनिमल प्रोटेशन रेस्क्यू असोसिएशनला (W.A.P.R.A)संस्थेला माहिती दिली. या संस्थेच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत अजगराला रेस्क्यू केलं. यावेळी येथील कोळी बांधवांनीही मदत केल्याचं अतुल कांबळे यांनी सांगितलं.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री समुद्राला आलेल्या भरतीमुळं या अजगराच्या बिळात पाणी गेल्यानं तो बाहेर आला असावा असा प्राथमिक अंदाज त्यांनी वर्तवला आहे. रेस्क्यू केलेला अजगर हा ८ फूट लांबीचा असून, बिनविषारी आहे. या अजगराला भारतातील सर्वात मोठा अजगर म्हणून ओळखला जातो. त्याशिवाय, या सापाची लांबी १८ ते २२ फुटापर्यंत होऊ शकते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement