मुंबईच्या दादर (dadar) येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात (शिवाजी पार्क) (shivaji park) काही दिवसांपूर्वी साप आढळल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा शिवाजी पार्कात साप आढळल्याची माहिती समोर येत आहे. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाजवळील परिसरात दुसऱ्यांदा सपाचं दर्शन झालं आहे.
सुरुवातीला धामण जातीच्या बिनविषारी सापाला सर्पमित्र किशोर प्रभू आणि अतुल कांबळे यांनी पकडले. त्यानंतर नाग (इंडियन स्पेक्टिकल कोब्रा) पकडला आहे. नाग स्मारकाच्या जागेतून बाहेर पडला आणि समोर असलेल्या स्काऊट आणि गाईड हॉलच्या झुडुपांमध्ये शिरला.
या नागाला बाहेर काढण्यासाठी सर्पमित्रांना जवळपास एक तास लागल्याची माहिती समोर येत आहे. त्याशिवाय काही दिवसांपूर्वी या प्रकरणी मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी पालिका प्रशासनाकडं (bmc) तक्रारही दाखल केली आहे.
सध्या पावसाच्या दिवस असून, शिवाजी पार्क मैदानात पावसाळ्यात (mumbai rains) ६ ते ७ फूटांपेक्षा अधिक गवत वाढलं आहे. या वाढलेल्या गवतात सापांचा (snake) वावर असल्याचं बोललं जात होतं. शिवाजी पार्क मैदानात सतत क्रिकेट, फुटबॉल खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या मोठ्या प्रमाणात असते. तसंच, लहान मूलंही क्रिकेट व फुटबॉलच्या सरावासाठी मैदानात येत असतात. त्याशिवाय सकाळी आणि संध्याकाळी मैदानात फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्यांची संख्या ही जास्त असल्यानं त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.