Advertisement

अंमली पदार्थांपासून दूर राहा - ईद निमित्त पोलिसांचा संदेश


अंमली पदार्थांपासून दूर राहा - ईद निमित्त पोलिसांचा संदेश
SHARES

ईद या सणासोबतच देशभरात 26 जून हा दिवस जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिवस (अँटी ड्रग्ज डे) म्हणून साजरा केला जात आहे. यासाठी साकिनाका पोलिस ठाण्यात एका विशेष कार्यक्राचे आयोजन करण्यात आले होते.


साकिनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश धर्माधिकारी, पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यावेळी ईदची नमाज अदा करुन आलेल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. सोबतच अंमली पदार्थ सेवन करण्यापासून दूर राहण्याचे आवाहनही केले. यावर जनजागृती मोहीम हाती घेत अंमली पदार्थांमुळे होणारे दुष्परिणाम सांगणारे बॅनरही लावले.

मुलांना आकर्षित करणारे पपेट घेऊन पोलिसांनी यावेळी जनजागृती केली. मुस्लिम बांधव देखील यावेळी पोलिसांना ईदच्या शुभेच्छा देत अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत सहभागी झाले होते.


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा