आता मुंबईहून थेट दिल्ली गाठणे अधिक सोईस्कर होणार आहे. माथेरानच्या डोंगरातून दिल्लीला जाण्यासाठी बोगदा होणार आहे. त्यामुळे मुंबईहून 12 तासांत राजधानी दिल्ली गाठता येणार आहे. जगातील सर्वांत लांब म्हणून ओळखल्या जाणा-या आणि दिल्ली ते उरणच्या जेएनपीटी बंदरास जोडणारा असा हा 1350 किमीच्या मार्ग आहे. यासाठी माथेरानच्या इको सेन्सेटिव्ह झोनच्या डोंगररांगातून 4.39 किमीचा आठ लेनचा बोगदा लवकरच खोदला जाणार आहे.
12 तासात गाठा दिल्ली
पनवेलजवळ माथेरानच्या पायथ्याशी मोरबे गावापासून हा बोगदा सुरू होणार असून, तो ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथनजीकच्या भोज गावापर्यंत असेल. पर्यावरण खात्याची परवानगी मिळाल्यानंतर त्याच्या बांधकामाचं कंत्राट नॅशनल हायवे अॅथॉरिटीने इरकॉन कंपनीला दिलंय. बोगद्यांवर 1 हजार 453 कोटींचा खर्च होणार आहे. यामुळे दिल्ली-मुंबई रस्त्याचं अंतर 24 तासांवरून 12 तासांवर येणार असून, हा ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस-वे आठ पदरीचा आहे. त्यावर एक लाख कोटी खर्च करण्यात येणार आहे.
NHAI ने अलीकडेच बोगद्याच्या बांधकामाची छायाचित्रे ट्विट केली आहेत आणि दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेच्या पॅकेज क्रमांक 17 वर काम सुरू असल्याचे सांगितले आहे. या संकुलाच्या मार्गात माथेरान टेकड्या आहेत, ज्याच्या मध्यभागी दुहेरी बोगदे बांधले जात आहेत. हा बोगदा 8 लेनचा असेल, ज्यामध्ये प्रवेश आणि बाहेर पडण्याचे दोन्ही मार्ग प्रत्येकी 4 लेनचे केले जाणार आहेत.
8 लेनचा रस्ता
माथेरान हिल्स हा इको सेन्सिटिव्ह झोन मानला जातो. हे हिल स्टेशन मुंबई आणि पुण्यातील लोकांच्या सर्वात आवडत्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे. माथेरान हे वन्य प्राण्यांचे घर आहे. त्यामुळेच हा बोगदा बांधण्यासाठी अनेक प्रकारच्या पर्यावरणीय मान्यता घ्याव्या लागल्या. निसर्गसौंदर्याने भरलेल्या या टेकडीच्या मधोमध 8 लेनचा रस्ता तयार करणे हे विशेष आव्हानात्मक काम आहे.
8 किलोमीटरसाठी खोदकाम
NHAI ने म्हटले आहे की, 4.150 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्यासाठी 8 किलोमीटर खोदकाम करावे लागेल. त्याचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. बोगद्याच्या बाहेरील मार्गावर वन्य प्राण्यांपासून संरक्षण करणारी यंत्रणाही सज्ज असेल. बोगद्याचे बांधकाम सुरू असून वर्षअखेरीस हा बोगदा पूर्णपणे तयार होईल असा NHAIचा अंदाज आहे.
बोगद्याचे वैशिष्ट्य काय?
4 किलोमीटर लांबीचा बोगदा वडोदरा-मुंबई द्रुतगती मार्गाचा भाग आहे. ठाणे जिल्ह्यातील भोई गावापासून रायगड जिल्ह्यातील पनवेलमधील मोरबे गावापर्यंत हा बोगदा बांधण्यात येत आहे. या बोगद्यात 8 क्रॉस पास बनवले जात आहेत, ज्यामुळे वन्य प्राण्यांना रस्ता ओलांडण्यास मदत होणार आहे. माथेरान टेकडीचा भाग असलेल्या ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथून बोगदा बांधण्यासाठी खोदाईचे काम सुरू करण्यात आले आहे.
हेही वाचा