
मुंबई मेट्रो लाईन 3 वर 23 नोव्हेंबरपासून दिव्यांग प्रवाशांना 25% सवलत मिळणार आहे. दिव्यांग प्रवाशांसाठी जाहीर केलेली 25% सवलत सध्या अंतिम चाचणी टप्प्यात आहे,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
“चाचणी पूर्ण झाल्यानंतर ही सवलत रविवार, 23 नोव्हेंबरपासून संपूर्ण प्रणालीवर लागू केली जाईल. या उपक्रमाचा उद्देश दिव्यांगांसह सर्व प्रवाशांना अधिक समावेशक प्रवासाचा अनुभव देणे हा आहे,” असे त्यांनी पुढे सांगितले.
मेट्रो लाईन 3, ज्याला अॅक्वा लाईन म्हणूनही ओळखले जाते. ही मुंबईची पहिली पूर्णपणे भूमिगत मेट्रो असून आरे ते कफ परेडपर्यंत धावते. या मार्गावरील सर्व स्थानके वातानुकूलित असून संपूर्ण प्रणाली दिव्यांग अनुकूल आणि ड्रायव्हरलेस ट्रेनसाठी तयार अशा तंत्रज्ञानाने सज्ज आहे.
ही सवलत सार्वजनिक वाहतूक दिव्यांग प्रवाशांसाठी अधिक परवडणारी आणि सोयीची करण्यासाठी मुंबई मेट्रोच्या समावेशक गतिशीलता धोरणाचा एक भाग आहे.
हेही वाचा
