Advertisement

पेडर रोड ३ ते ४ दिवसांत वाहतुकीसाठी होणार खुला


पेडर रोड ३ ते ४ दिवसांत वाहतुकीसाठी होणार खुला
SHARES

ऑगस्ट महिन्यात मुंबईत पडलेल्या मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी नुकसान झालं. पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचलं. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं. त्यात दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध पेडर रोडवर लँडस्लाईड झालं. मोठ्या प्रमाणात रस्ता खचला असल्यानं प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पेडर रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. परंतु आता लवकरच हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.

मागील महिन्यात मुसळधार पावसामुळं रात्रीच्या सुमारास रस्ता खचल्यानं हा रॉड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र आता या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असून, पुढील ३ ते ४ दिवसात हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याची माहिती महापालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली. 

पुढील काही दिवसांत या रस्त्यावरून एकेरी वाहतुकीला परवानगी देण्यात येणार आहे. त्यामुळं हाजिअलीहुन मारिन लाईन्सच्या दिशेनं प्रवास करणं प्रवाशांना सहज शक्य होणार आहे. परंतु, या रस्त्याला लागून असलेला उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान याबाबत अंतिम निर्णय वाहतूक पोलीस घेणार असल्याचंही गायकवाड यांनी सांगितलं.

ऑगस्ट महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळं रस्त्याच्या दुतर्फा असणारी अनेक झाडं पडली. अनेक गाड्यांचं नुकसान झालं. अनेक ठिकाणी मातीचा ढीगही रस्त्यावर आला. मुसळधार पावसामुळे पेडर रोड येथील रस्त्याला तडे गेले होते. मागील महिन्यात मुंबईतील २ ठिकाणी लँडस्लाईडच्या घटना घडल्या.

कांदिवली इथं डोंगराचा काही भाग धासळला. त्यामध्ये कुठलीही जिवीतहानी झाली नव्हती. परंतु. तो मार्ग सध्या बंद ठेवण्यात आला होता. त्या मार्गावर दगड, माती सर्वत्र पसरली होती. पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं होतं. ट्रॅकवर पाणी चढत गेलं आणि प्रवाशांना वाचवण्यासाठी NDRF ला पाचारण करण्यात आलं होतं.



हेही वाचा -

राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं ‘या’ विषयावर पत्र

बलात्काराच्या गुन्ह्यात ‘या’ अभिनेत्याला पोलिसांनी केली अटक


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा