Advertisement

मुंबईशी आपलं अतूट नातं - प्रिन्स आगा खान


मुंबईशी आपलं अतूट नातं - प्रिन्स आगा खान
SHARES

शिया इस्माईली मुस्लिम समाजाचे इमाम आणि आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कचे संस्थापक अध्यक्ष प्रिन्स आगा खान यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कमार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांबाबत चर्चाही केली.

आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्क मार्फत महाराष्ट्रात प्रस्तावित असलेल्या सर्व उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्य करू, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. तर महाराष्ट्र आणि मुंबईशी आपले विशेष आणि अतुट नाते असल्याचे आगा खान यांनी सांगितलं.


मुंबईत लहान मुलांसाठी कॅन्सर रुग्णालय

आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्क आणि द आगा खान हेल्थ सर्व्हिसेस यांच्यातर्फे मुंबईत कॅन्सर आणि इतर विकाराने पीडित असलेल्या मुलांसाठी रुग्णालय स्थापन करण्यात येणार आहे. त्याबाबत यावेळी चर्चा झाली. याचबरोबर जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञान या रुग्णालयात उपलब्ध असेल, अशी माहिती त्यांनी दिली.


मुंबई आणि महाराष्ट्राशी विशेष नातं

इमाम आगा खान हे २० फेब्रुवारीपासून भारताच्या दौऱ्यावर आहेत. वन पर्यटनातून स्थानिकांना रोजगार, गावांचा विकास, जलसंधारण आदींबाबतही यावेळी चर्चा झाली. महात्मा गांधी यांचे वास्तव्य लाभलेल्या पुण्यातील आगा खान पॅलेसला गतवैभव प्राप्त करून देणेबाबत यावेळी चर्चाही झाली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा