Advertisement

१ ते १७ फेब्रुवारीदरम्यान कुुष्टरोगाविषयी विशेष मोहीम


१ ते १७ फेब्रुवारीदरम्यान कुुष्टरोगाविषयी विशेष मोहीम
SHARES

कुष्टरोग्यांविषयी समाजात असलेला समज आणि त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा, याच उद्देशाने १ ते १७ फेब्रुवारीदरम्यान बॉम्बे लेप्रसी प्रोजेक्ट या संस्थेकडून 'स्पर्श' ही विशेष मोहीम राबवली जाणार आहे.

मुंबईतील मालाड आणि मालवणी परिसरात पहिल्यांदाच ही विशेष मोहिम राबवली जाणार आहे. या विशेष मोहिमेत कुष्ठरोग्यांविषयी समाजात आणि माणसाच्या मनात असणारी घृणा कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.


'स्पर्श' ही मोहीम दरवर्षी ३൦ आणि ३१ जानेवारीदरम्यान बॉम्बे लेप्रसी प्रोजेक्ट संस्थेकडून नेहमी राबवली जाते. या दिवशीही ही मोहीम राबवली जाणार आहे. त्यानंतर मालाड आणि मालवणी परिसरात कुष्टरोग्यांविषयी एक स्पेशल सर्वे घेतला जाईल. ज्यात घरा-घरात जाऊन लोकांची विचारपूस केली जाईल. काही प्रश्नांची नियमावली या दरम्यान लोकांना दिली जाणार आहे. ज्यात कुष्टरोग्यांविषयी काय वाटतं, किंवा जर त्या घरात कुणी कुष्टरोगी आहे का? याची पडताळणी केली जाईल.

३൦ जानेवारीला महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे. हा दिवस कुष्टरोग निवारण दिन म्हणून पाळला जातो. महात्मा गांधी यांनी कुष्टरोग्यांसाठी बरेच कार्य केलं आहे. त्याच्याच पार्श्वभूमीवर कुष्ठरोग्यांविषयी स्पर्श ही मोहीम राबवली जाते. कुष्ठरोग हा आजार अनेकदा लपवला जातो. पण, त्याचं समुळ उच्चाटन व्हावं याच हेतूनं ही मोहीम राबवली जाणार आहे. समाजातील शेवटच्या व्यक्तीला जर कुष्टरोग असेल तर त्याचंही निदान करून बरं करण्याचा मानस आहे.
- डॉ. राजू जोटकर, आरोग्य सहाय्यक संचालक, कुष्ठरोग मुंबई


औषधे आणि प्राथमिक काळातल्या उपचारांमुळे कुष्टरोग पूर्णतः बरा होऊ शकतो. या रोगामुळे प्रामुख्याने त्वचा, पेरिफेरल धमन्या, म्युकोझल आवरणे तसंच, वरच्या बाजूची श्वसनसंस्था आणि डोळे यांच्यावर विपरित परिणाम होतो. कुष्टरोग हा अगदी तान्ह्या बाळापासून वृद्धांपर्यंत कुणालाही होऊ शकतो. आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, कुष्टरोग हा दीर्घकाळ टिकणारा असला तरीही, योग्य उपचारांती तो बरा होऊ शकतो. या रोगाची लक्षणे त्वरीत ओळखण्यासाठी आपली त्वचा आणि डोळ्यांच्या तपासण्या करून घ्याव्यात.

- डॉ. पी. एम. भुजंग, अध्यक्ष, असोसिएशन ऑफ हॉस्पिटल्स


काय आहे कुष्टरोग ?

कुष्टरोग हा संसर्गजन्य रोग असून त्यामुळे तीव्र त्वचारोग, हात, पाय आणि त्वचेच्या धमन्यांमध्ये बिघाड होऊ शकतो. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, जगातील दर एक दशलक्ष लोकसंख्येच्या एक चतुर्थांश लोकांना आज कुष्टरोगाचा धोका संभवत असून यातील बहुतांश रुग्ण हे भारतातील आहेत.

मायक्रोबॅक्टेरियम लॅप्री किंवा मायक्रोबॅक्टेरियम लेप्रोमॅटोसिस या जंतूंमुळे कुष्टरोग हा दीर्घकालीन रोग होतो. सुरुवातीला या रोगाची लागण कोणतीही लक्षणे दाखवून देत नसली तरीही, हा रोग ५ ते २० वर्षांपर्यंत राहतो. नसा, श्वसन संस्था, त्वचा आणि डोळ्यांमध्ये गाठी येणे हे या रोगाचे प्राथमिक लक्षण आहे. यामुळे, वेदना पटकन न कळणे, वारंवार दुखापत झाल्यामुळे एखादा अवयव पूर्णतः निकामी होणे किंवा लक्षात न आलेल्या जखमांमध्ये इन्फेक्शन होणे आदी गंभीर समस्या उद्भवू शकतात. अशक्तपणा किंवा डोळ्यांना कमी दिसण्यासारखी लक्षणेही महत्त्वाची ठरतात.

दरवर्षी १.२ ते १.३ लाख लोकांना कुष्टरोग झाल्याचं निदान केलं जात असून यातील ५८ टक्के रुग्ण भारतातील आहेत. लहान मुलांना हा आजार लवकर होत असल्याने त्यांना अधिक तुच्छतेला सामोरे जावं लागतं. परिणामी, लहानपणापासूनच त्यांच्या मूलभूत हक्कांवर आणि वैद्यकीय सेवेवर गदा येऊ शकते. भारतात सध्या राष्ट्रीय कुष्टरोग निवारण उपक्रम (एनएलईपी) हा जगातला सर्वात मोठा कुष्टरोग निवारण प्रकल्प सुरू आहे.


कुष्टरोगाचा प्रतिबंध कसा कराल?

प्राथमिक निदान आणि बाधित रुग्णाची योग्य काळजी आणि सुयोग्य उपचार हा कुष्टरोग प्रतिबंधाचा उत्तम उपाय आहे. कुष्टरोगी व्यक्तीशी संपर्क आल्यानंतर किमान पुढची पाच वर्षे सातत्याने वार्षिक तपासणी करून घेणं आवश्यक ठरतं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय