Advertisement

नगरसेवकांसह कुटुंबियांची विशेष तपासणी, अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

मुंबईत कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. मुंबई महापालिकेची आरोग्य यंत्रणा कोरोनामुक्तीसाठी रात्रंदिवस काम करत आहे. मात्र अजूनही मुंबईकरांची तपासणी घरोघरी जाऊन केली जात नाही.

नगरसेवकांसह कुटुंबियांची विशेष तपासणी, अतिरिक्त आयुक्तांचे आदेश
SHARES

मुंबईत कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत.  मुंबई महापालिकेची आरोग्य यंत्रणा  कोरोनामुक्तीसाठी रात्रंदिवस काम करत आहे. मात्र अजूनही मुंबईकरांची तपासणी घरोघरी जाऊन केली जात नाही. मात्र आता नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबियांची विशेष तपासणी करण्यात येणार आहे.  अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. दरम्यान, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी फक्त नगरसेवक नव्हे तर संपूर्ण मुंबईकरांची चाचणी करण्याची मागणी केली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्य सचिव अजोय मेहता यांना पत्र लिहिलं आहे. पत्रात त्यांनी म्हटलं की, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी नगरसेवक आणि कुटुंबियांची स्वॅब तपासणीसाठी आदेश जारी केले आहेत. ही तपासणी खाजगी लॅबतर्फे करण्यात येणार आहे. मुंबईकर, अभियंता, सफाई कर्मचारी, रुग्णालयात सेवा देणारे डॉक्टर आणि परिचारिका यांची अशा पद्धतीने तपासणी का नाही? असा सवाल अनिल गलगली यांनी उपस्थित केला आहे.

मुंमुंबई महापालिकेचा हा दुजाभाव असल्याचा आरोप अनिल गलगली यांनी केला आहे. स्वतः आयुक्तांनी लक्षणे नसल्यास कुठल्याही प्रकारची तपासणी न करण्याचे सांगितले असताना हे वेगळे आदेश का  काढले जात आहेत. अनिल गलगली यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.



हेही वाचा -

राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 10 हजार 498 वर

‘याच’ अटींवर सोडता येईल महाराष्ट्र, परप्रांतीयांसाठी दिशानिर्देश जारी




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा