Advertisement

'चुकलंच जरा डॉक्टर होऊन'


'चुकलंच जरा डॉक्टर होऊन'
SHARES

डॉक्टर म्हणजे माणसातला देव ! मात्र डॉक्टरांवरच सध्या हल्ले होत आहेत. डॉक्टर हा आधी माणूस आहे, हे सोयीस्करीत्या लोकं विसरतात आणि डॉक्टरांकडून काही चूकच होऊ नये, अशी अपेक्षा देखील ते करतात. डॉक्टरांची कहाणी सांगणारं 'चुकलंच जरा डॉक्टर होऊन' हे गाणं लोकांसमोर येतंय.रूग्णांचा जीव वाचावा यासाठी डॉक्टर कायमच रूग्णांच्या सेवेसाठी हजर असतात. त्यामुळे उपचारादरम्यान काही बरे वाईट झाल्यास, डॉक्टरांना मारहाण करणे योग्य नाही, असा संदेश या गाण्यातून दिला आहे. या गाण्यात अनिकेत विश्वासराव, प्रियांका यादव आणि ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी डॉक्टरांच्या भूमिका केल्या आहेत.

प्रवीण राजा कारळे यांनी या गाण्याचे दिग्दर्शन केलं आहे. डॉ. स्वप्नील मानकर, डॉ. सुनंदा धीवरे या दोन डॉक्टरांनीच हे गाणं लिहीले आहे. तर रोहन पटेल यांनी संगीताची बाजू सांभाळली आहे. सुरेश वाडकर, डॉ. उत्कर्ष शिंदे आणि वैशाली सामंत यांच्या आवाजात या गाण्याचे रेकॉर्डिंग करण्यात आलं आहे.

किमान या गाण्यानंतर तरी लोकांचे विचार बदलतील आणि डॉक्टरांना होणाऱ्या मारहाणीला आळा बसेल, अशी आशा करायला हरकत नाही

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा