काळाचौकीत विकासकामांची सुरुवात

 Abhyudaya Nagar
काळाचौकीत विकासकामांची सुरुवात
काळाचौकीत विकासकामांची सुरुवात
काळाचौकीत विकासकामांची सुरुवात
See all

काळाचौकी - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागांमध्ये आपापल्या पक्षाचं कर्तृत्व मतदारांना दाखवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्या निधीतून सध्या काळाचौकीच्या अभ्युदयनगरमधील इमारत क्रमांक 34 मध्ये लवकरच नव्या फरशा लावण्यात येत आहेत. तसंच काळेवाडी येथील बाळ गोपाळ मंडळाच्या समाजमंदिराचं नूतनीकरणही लवकरच होईल. या कामांची सुरुवात 15 डिसेंबर रोजी स्थानिक रहिवाशांच्या हस्ते करण्यात आली.

या वेळी उपविभागप्रमुख गजानन चव्हाण, भारत म्हाडगुत, नगरसेविका वैभवी चव्हाण, शाखाप्रमुख दत्ता पोंगडे, शाखा संघटक अनुराधा इनामदार, कामिनी मिश्रा, उपशाखाप्रमुख जयसिंग भोसले, नागवेकर आदी पदाधिकारी आणि स्थानिक रहिवासीही उपस्थित होते.

Loading Comments